Ganpat Gaikwad : भाजप आमदार गायकवाड गोळीबार; अहमदनगरमधून एकाला अटक
Ganpat gaikwad : उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या गोळीबार प्रकरणात ठाणे पोलिसांची मोठी कारवाई.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण

भाजप आमदाराच्या चालकाला अटक

ठाणे पोलिसांची अहमदनगरमध्ये कारवाई
Ganpat Gaikwad Firing case updates : गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांना आणखी झटका बसला आहे. ठाणे पोलिसांनी फरार असलेल्या त्यांचा चालक रंजित यादव याला अटक केली आहे. (Thane Police Arrested Ranjeet Yadav, Driver of bjp mla Ganpat Gaikwad)
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले होते. त्यांच्या उपचार सुरू असून, गणपत गायकवाड हे सध्या अटकेत आहे.
भाजप आमदाराच्या चालकाला अटक
उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात ही गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.
गणपत गायकवाड यांना अटक केल्यानंतर त्यांचा मुलगा वैभव गायकवाड, चालक रंजित यादव आणि नागेश बडेकर हे फरार झाले होते. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटिसही जारी केलेली आहे.