Seema Haider: प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचे ‘हे’ व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का? पतीसोबत…

मुंबई तक

ADVERTISEMENT

seema haider sachin love story pubg fled pakistan to meet over india instagram video
seema haider sachin love story pubg fled pakistan to meet over india instagram video
social share
google news

Seema Haider Sachin Love Story: सोशल मीडिया असो किंवा एखादा कट्टा भारतापासून पाकिस्तानपर्यंत सध्या सर्वच ठिकाणी सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिनच्या (Sachin) लव्हस्टोरीची (Love Story) चर्चा रंगली आहे. सीमा हैदर ही पाकिस्तानची आहे, तर सचिन हा भारतीय तरूण आहे. या दोघांमध्ये पब्जीमुळे (Pubg) प्रेम जुळलं होतं. या प्रेमापायी सीमा पाकिस्तानची बॉर्डर ओलांडून चार मुलांसह ती भारतात दाखल झाली होती. तिने भारतात येऊन सचिनशी लग्न देखील केले होते. त्यामुळे आता या दोघांच्या लव्हस्टोरीची देशभरात चर्चा रंगली आहे. (seema haider sachin love story pubg fled pakistan to meet over india instagram video)

ADVERTISEMENT

भारत (INDIA) असो किंवा पाकिस्तान (Pakistan) सीमा आणि सचिनच्या या लव्हस्टोरीची चर्चा रंगली आहे. दोघांच्या या लव्हस्टोरीची तुलना ही गदर सिनेमाशी देखील होते आहे. या दरम्यान सीमा हैदर आणि सचिनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.ज्यामध्ये सीमा आणि सचिन एकमेकांवर प्रेम व्यक्त करतानाही दिसत आहेत. एका व्हिडिओत तर सीमा गदर सिनेमाचे गाणे गातानाही दिसली आहे. ”ओ घर आजा परदेसी, के तेरी मेरी एक जिंदडी, असे गाणे गुणगुणताना सीमा दिसतेय.

हे वाचलं का?

आणखीण एका व्हिडिओत सचिन तिचे केस उगवताना दिसला आहे. या व्हिडिओच्या गाण्याला आणखीण एक बॉलिवूडचे गाणे वाजताना दिसत आहे. या व्हिडिओत सीमा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली आहे.

हे ही वाचा : सोलापूर : दहावीतील विद्यार्थ्याने नववीतील मुलाकडून 10 लाख कसे उकळले?

ADVERTISEMENT

सासऱ्यांचे गंभीर आरोप

सासरे मीर जान जखरानी यांनी सीमावर गंभीर आरोप केले आहेत. सीमाने घर विकून संपूर्ण सामान भाड्याच्या घरात ठेवले आहे. तसेच मुलाने सऊदीवरून पाठवलेले 7 लाख रूपये आणि 7 तोळे सोने घेऊन ती पळाली आहे. सासऱ्यांनी आता पाकिस्तानमध्ये सीमा आणि मुल बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

ADVERTISEMENT

सीमा अशी आली भारतात

सीमाने सचिनला भेटण्यासाठी नेपालचा टूरीस्टचा विजा घेतला होता. ती शारजाहच्या रस्त्याने काठमांडू पोहोचली आणि तिथून बस पकडून ती भारतात आली आहे. युट्यूब व्हिडिओ पाहून ती कराचीवरून भारतात आली आहे. त्यामुळे बेकायदेशीपणे भारतात प्रवेश केल्याप्रकरणी तिला अटक देखील करण्यात आली होती. पण नंतर तिला जामीन मिळाला होता.

तिसऱ्या व्हिडिओत सीमा सचिन एकत्र दिसत आहेत. सीमाने सचिनच्या हातात हात घातला आहे. तिने डोक्यावर सिंदूर देखील लावली आहे.

दोघांचा आणखीण एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सीमा स्वत:च्या हाताने सचिनला पाणी पाजते आहे. यानंतर सचिन देखील तिला पाणी पाजतो. या व्हिडिओत सीमाने साडी परिधाण केली आहे.

हे ही वाचा :  Crime: ऑफिसमध्ये रक्ताचा सडा! बॉसची तलवारीचे वार करत हत्या

पाकिस्तानी नवऱ्याचे म्हणणे काय?

सीमा हैदरचा नवरा सौदी अरेबियात काम करतो. ज्यावेळेस पतीला बायको आणि मुले पाकिस्तानातून भारतात गेल्याची माहिती मिळाली, त्यावेळेस त्यांनी एक व्हिडिओ जारी करत, माझी मुलं मला परत हवी आहेत, अशी मागणी त्याने केली.

सीमाचे पती गुलाम हैदर जखरानी गेल्या तीन वर्षापासून सौदी अरेबियात आहेत. सीमाने माझ्यासोबत लव्ह मॅरीज केल्याचा दावा पतीने केला आहे. तसेच सीमाने घर विकले आहे आणि ती मुल आणि दागिने घेऊन भारतात गेली आहे. पब्जी गेम खेळून ती वेडी झाली आहे.त्यामुळे तिला पाकिस्तानात पाठवले जावे, अशी मागणी त्याने केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT