Crime: मुंबईतील महिला डॉक्टरचा न्यूड व्हिडीओ केला शूट, ‘हा’ व्यक्ती करायचा नको ते!

ADVERTISEMENT

Shatabdi Hospital in Chembur nude video of female doctor was made sweeper
Shatabdi Hospital in Chembur nude video of female doctor was made sweeper
social share
google news

Mumbai Crime : मुंबईतील चेंबूरमधील शताब्दी रुग्णालयाच्या (Shatabdi Hospital) वसतिगृहात अंघोळ करत असताना 27 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीचे (Medical Student) व्हिडीओ रेकॉर्डिंग (Video) केल्याची धक्कादाय घटना घडल्याचे उघड झाले आहे. वसतिगृहातील बाथरूममध्ये (Dormitory bathroom) विद्यार्थिनीचा अंघोळ करताना व्हिडीओ केल्याने गोवंडी पोलिसांनी शताब्दी रुग्णालयातील सफाई कर्मचारी अशोक गुप्ताला अटक केली आहे.

बाथरूममध्ये गेल्यावर केले कृत्य

गोवंडी पोलिसांनी सांगितले की, आरोपी अशोक गुप्ता हा रुग्णालयात रोजंदारीवर येणारा सफाई कामगार आहे. रुग्णालयामध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनी सहभागी झाली होती. त्या कार्यक्रमानंतर ती अंघोळ करून फ्रेश होण्यासाठी शताब्दी रुग्णालयाच्या निवासी क्वार्टरमध्ये ती गेली होती. रुग्णालयाच्या वसतिगृहामध्ये पुरुष आणि महिलांचे वेगवेगळे बाथरूम असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा >> काकूचं फोनवर भलत्याशी गुटर्गू.. प्रेमात वेडा झालेल्या 10 वर्ष छोट्या पुतण्याने गळाच चिरला!

खिडकीतून दिसला आरोपी

विद्यार्थिनी जेव्हा अंघोळ करत होती, त्यावेळी अशोक गुप्ता या सफाई कामगाराने बाथरूमवर चढून विद्यार्थिनीचा व्हिडीओ करत होता. त्याचे हे कृत्य विद्यार्थिनीच्या लक्षात येताच तिने आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थिनीने या घटनेची माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाताला देण्यात आली. त्यानंतर या घटनेप्रकरणी अशोक गुप्ता विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांच्या तपासाल गती

रुग्णालयात येणाऱ्या अशोक गुप्ता या सफाई कामगाराला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा मोबाईलही जप्त केला आहे. त्याच्या मोबाईलमध्ये आणखी काही व्हिडीओ आहेत का त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तो रुग्णालयात किती दिवसांपासून काम करत आहे. त्याने याआधी तसे काही घृणास्पद काम केले आहे का त्याचाही तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा >> Animal : “माझी मुलगी थिअटरमधून रडतच बाहेर पडली”, संसदेत पोहोचला ‘अ‍ॅनिमल’चा मुद्दा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT