Solapur : स्वतःच्या श्रद्धांजलीच स्टेटस ठेवलं अन् झाडल्या तीन गोळ्या, कारण…
विकास कोळपे यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते. या स्टेटसच्या सुरूवातीला विकास कोळपे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम…! असे म्हणत स्वत:लाच श्रद्धांजली वाहिली आहे.
ADVERTISEMENT
Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सोलापूर कारागृहातील एका पोलीस शिपायाने कारागृहासमोरच स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. विकास कोळपे (34) असे या पोलीस (Police Constable) शिपायाचे नाव आहे. विकास यांनी सोशल मीडियावर (Social media) स्वत:च्या श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून हे टोकाचं पाऊल उचललं आहे. तसेच या स्टेटसमध्ये विकास यांनी त्यांच्या आत्महत्येस कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवत गंभीर आरोप केले आहेत. या घटनेने आता सोलापूर (Solapur) कारागृहात खळबळ माजली आहे. (solapur crime news constable shot himself in front of jail after post on social media solapur news)
ADVERTISEMENT
विकास गंगाराम कोळपे यांची नेमणूक सोलापूरात कारागृहात होती. आणि या कारागृहाच्या वसाहतीतच विकास कोळपे राहायचे. 9 डिसेंबरला म्हणजेच शनिवारी सायंकाळी घटनेच्या दिवशी विकास कोळपे यांनी सोशल मीडियावर स्वत:च्या श्रद्धांजलीची पोस्ट लिहून कारागृहासमोरच स्वत:वर तीन गोळ्या झाडून घेतल्या होत्या. ही बाब कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी विकास कोळपे यांना शासकीय रूग्णालयात जखमी अवस्थेत दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी ताबडतोब विकास कोळपे यांच्यावर उपचार सूरू केले. काही वेळानंतर नातेवाईकांनी विकास यांना पुढील उपचारासाठी खाजगी रूग्णालयात हलवण्याचा निर्णय़ घेतला होता. सध्या त्यांची प्रकृती खूपच गंभीर असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शिकवलं? बायका-मुलांवर…, भुजबळ काय म्हणाले?
सोशल मीडियावर ठेवलं स्टेटस
विकास कोळपे यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते. या स्टेटसच्या सुरूवातीला विकास कोळपे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम…! असे म्हणत स्वत:लाच श्रद्धांजली वाहिली आहे. यासोबत स्वत:च्या जन्म आणि मृत्यूची तारीख देखील लिहली आहे. तसेच विकास यांनी त्यांच्या आत्महत्येस दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवले आहे.
हे वाचलं का?
कारागृह उपमहानिरीक्षक माननीय श्रीमती स्वाती साठे आणि योगेश देसाई यांनी माझे मानसिक खच्चीकरण केले आहे. या दोन्हीही कारागृह अधिकाऱ्यांच्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूस सर्वस्वी जबाबदार हे दोन कारागृह अधिकारी असणार असल्याचा गंभीर आरोप विकास कोळपे यांनी केला आहे. या घटनेने आता कारागृहात खळबळ माजली आहे.
हे ही वाचा : Gopichand Padalkar : इंदापुरात आमदार पडळकरांवर भिरकावल्या चप्पला; भुजबळ भडकले
दरम्यान सध्या विकास कोळपे यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. विकास कोळपे यांच्या आत्महत्येप्रकरणी आता कारागृह अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT