गोष्ट एका सायनाईड जॉलीची! 14 वर्षात एकाच घरातील 6 हत्या, नेमकं प्रकरण होतं काय?
केरळमधील कोझिकोडमधील ही एका कुटुंबाची कहाणी जिथे 14 वर्षांतच 6 लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यांना कोणताही आजार नव्हता. 17 वर्षांनंतर जेव्हा या 6 मृत्यूचे सत्य समोर आले तेव्हा मात्र सारेच हादरुन गेले होते.
ADVERTISEMENT

Cyanide jolly : केरळमधील कोझिकोडमधील पोन्नमट्टम (Kozhikode Ponnamattam) परिसरात थॉमस कुटुंब (Thomas family) येथे राहत होते. त्यावेळी हे कुटुंब म्हणजे समृद्ध आणि श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखले जात होते. या कुटुंबाचा प्रमुख टॉम थॉमस होता.तर त्यांच्या पत्नीचे नाव अनम्मा थॉमस होते. या जोडप्याला दोन मुलगे होते. रॉय थॉमस आणि रोजो थॉमस. 1997 मध्ये रॉयचा विवाह जॉली अम्मा जोसेफशी (Jolly Amma Joseph) झाला होता. त्या लग्नानंतर जॉली अल्पावधीतच सर्वांची लाडकी झाली. तिने कुटुंबाची खूप चांगली काळजी घेत आपल्या वाणीने सगळ्यांना एकत्र ठेवली.(story of cyanide jolly 6 murders in the same house in 14 years was it a real case)
लग्नानंतर नोकरीचं नाटक
जॉलीचं रॉयशी लग्न झालं तेव्हा त्याला कोणतीही नोकरी नव्हती. वडील टॉम थॉमस यांच्याकडून घरखर्चासाठी पैसे घेत होता. त्यामुळे जॉलीने आपला अभ्यास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून भविष्यात नोकरी मिळेल ही अशा होती. शकेल. लग्नानंतर काही काळानंतर, त्याने आपल्या घरच्यांना सांगितले की, त्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कालिकत येथे नोकरी मिळाली आहे. त्यानंतर 2002 मध्ये जॉलीची सासू अन्नम्मा यांची तब्येत अचानक बिघडली, आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथील उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. 22 ऑगस्ट 2002 रोजी घरी येऊन फक्त दोन महिने उलटले होते. मात्र अन्नम्माची तब्येत पुन्हा बिघडली, आण त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूचे खरे कारण
त्यावेळी त्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तरीही मृत्यूचे खरे कारण समजून घेण्यासाठी डॉक्टरांनी कुटुंबीयांना पोस्टमार्टम करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यावेळी कुटुंबीयांनी पोस्टमार्टम करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी अन्नम्मावर अंत्यसंस्कारही केले. कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंब दु:खात गेले. पण वेळ निघून गेला आणि कुटुंबाचे आयुष्य पुन्हा रुळावर आले. त्यानंतर 26 ऑगस्ट 2008 रोजी अन्नम्माची 6 वी पुण्यतिथी 4 दिवस आधीच करण्यात आली. त्या कार्यक्रमाला इतर नातेवाईकही उपस्थित होते. मात्र त्यानंतर 26 ऑगस्ट रोजीच टॉम थॉमसचा अचानक मृत्यू झाला.
हे ही वाचा >> Gadchiroli: कुंभारे कुटुंबाला सुनेने ‘या’ विषाचा भरवला घास, ‘यासाठी’ काढला काटा!
मालमत्तेची विभागणी
टॉम थॉमसचा मृत्यूचे कारणही हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. यावेळीही कुटुंबीयांनी टॉमचा मृत्यूचे शवविच्छेदन न करता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 6 वर्षांत कुटुंबातील दुसरा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंब विभक्त होत त्यांच्या मालमत्तेची विभागणी झाली आणि ते विभक्त राहू लागले.










