Crime : जादूटोण्याच्या संशयातून गळा घोटला,नंतर रॉडने…; भयंकर घटनेने चंद्रपूर हादरलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

suspicion of witchcraft strangulated superstition man killed chandrapur crime story
suspicion of witchcraft strangulated superstition man killed chandrapur crime story
social share
google news

चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जादूटोणा करण्याच्या संशयातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. 55 वर्षीय अमृत बाजीराव असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपी आणि अमृत बाजीरावमध्ये जमीनीवरून वाद सूरू होता. या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला आहे, तसेच आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. (suspicion of witchcraft strangulated superstition man killed chandrapur crime story)

ADVERTISEMENT

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तहसील गावातील डोनी गावात ही घटना घडली आहे. या घटनेत अमृत बाजीरावची जादूटोणा करण्याच्या संशयातून हत्या करण्यात आली आहे. अमृत बाजीरावचे गावातीलच विजयपाल आलम सोबत जमिनीवरून वाद सुरु होता. या वादातूनच विजयपाल आलमने गावातील फंक्शन हॉलमध्ये गळा दाबून अमृत बाजीरावची हत्या केली. यानंतर रॉडने डोक्यावर वार करून त्याची हत्या केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एसपी रविंद्र सिंह परदेसी त्यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

हे ही वाचा : Mumbai-Goa Highway : ‘चमकोमॅन’ वर भरोसा ठेवणार का..?, मनसेने भाजप नेत्याला डिवचले

ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, अमृत बाजीरावची गावातील आरोपी विजयपाल आलम (35) सोबत जमीनीवरून वाद सुरु होता. या माहितीनंतर पोलिसांनी विजयपाल आलमला ताब्यात घेतले.यावेळी विजयपाल आलमची चौकशी केली असता त्याने गु्न्ह्याची कबूली दिली. तसेच हत्येमागचं कारण देखील सांगितले आहे.

हे वाचलं का?

आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि बाजीरावमध्ये जमिनीवरून सतत वाद व्हायचा. या वादातून अमृत बाजीराव सतत जादूटोणा करून जीवे ठार मारण्याची धमकी द्यायचा. या धमकीमुळे विजयपालमध्ये मनात भिती बसली होती. आणि बाजीराव जादूटोणा करून हत्या करेल असा संशय होता. त्यामुळे हा जादूटोणा आणि भिती त्याच्यात इतकी बसली की त्याने त्याच्याच हत्येचा कट रचला,आणि संधी मिळताच गावातील हॉलमध्ये त्याची हत्या करण्यात आली.

पोलीस चौकशीत अमृत बाजीराव यांची डोनी गावात गळा आवळून हत्या केली होती. तसेच आरोपी विजयपाल आलमने हत्येची कबूली दिली आहे. दोघांमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. या वादातून मृत अमृत बाजीरावने आरोपीला जादूटोणा करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीतूनच आरोपीने विजयपालने अमृत बाजीरावची हत्या केली,अशी माहिती पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी दिली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Zareen Khan : प्रसिद्ध अभिनेत्रीला होणार अटक…, नेमकं प्रकरण काय?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT