‘तुझ्या अंगातील भूत काढायचं असेल, तर सेक्स…’, बहिणीच्या नवऱ्यानेच 8 महिने केला रेप
तांत्रिकाने अंगात भुत शिरल्याची भीती दाखवून तरूणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तब्बल 8 महिन्यापासून हा तांत्रिक अशाप्रकारची भीती दाखवून तरूणीवर बलात्कार करत होता.
ADVERTISEMENT
देशभरात बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका तांत्रिकाने अंगात भुत शिरल्याची भीती दाखवून तरूणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तब्बल 8 महिन्यापासून हा तांत्रिक अशाप्रकारची भीती दाखवून तरूणीवर बलात्कार करत होता. त्यानंतर तांत्रिक भुत प्रेत उतरण्याच्या नावाखाली फायदा उचलत असल्याचे तरूणीला कळताच तिने पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर आरोपी तांत्रिकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.(tantric baba fearing that a demon entered his body and 8 month continue rape madhya pradesh crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरूणी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तिच्या मावशीच्या मुलीच्या घरी राहायला गेली होती. या घरात तिच्या मावशीची मुलगी आणि तिचे पती राहायचे. या घरात तिची तब्येत साऱखी सारखी बिघडायची, तिला सारखी-सारखी चक्कर देखील यायची. सततच्या आजारावर तिच्या भाऊजींनी तिला भूतबाधा झाल्याची माहिती दिली होती.
हे ही वाचा : पाहुणा म्हणून आला अन् घरी परतलाच नाही, दोन सख्ख्या मावस भावांचा दुदैवी अंत
या तरूणीची बहिण अंजनी नाहरचा पती कुलदीप नाहर हा तांत्रिक होता. हा तांत्रिक तिला एका दर्ग्यात घेऊन गेला आणि म्हणाला, तुझ्या शरीरात भूताने वास केला आहे. याचा परिणाम तुझ्या कुटुंबावरही होत आहे. यातून मुक्त व्हायचे असेल तर माझ्याशी शारीरीक संबंध ठेवावे लागतील.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पिडितेने पुढे सांगितले की, तांत्रिक भाऊजीने त्याच रात्री तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर सतत भूत आणि प्रेताची भीती दाखवून भाऊजी तिच्यावर बलात्कार करू लागला. तसेच बलात्काराला विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. असे साधारण भूत प्रेत घालवायच्या नावाखाली त्याने तब्बल 8 महिने तिच्यावर बलात्कार केला होता.या घटनेनंतर पिडीतेने या संपू्र्ण घटनेची माहिती आईला दिली होती. त्यानंतर दोघांनी मिळून बुधनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.या घटनेचा अधिकचा तपास सुरु आहे. मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे.
हे ही वाचा : लिव्ह इन रिलेशन, मृतदेहाचे तुकडे तुकडे अन् फ्रिज…श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती!
ADVERTISEMENT