Mumbai लोकलमधून 17 वर्षीय गर्लफ्रेंडचं अपहरण अन् साताऱ्यात उलगडलं सारं गुपित!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Thane: Abduction of 17-year-old girl from local, location traced 250 km away
Thane: Abduction of 17-year-old girl from local, location traced 250 km away
social share
google news

Mumbai Local News : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नुकतंच एक प्रकरण समोर आलं, यामध्ये ठाणे येथून एका 17 वर्षीय मुलीचे फिल्मी अंदाजात अपहरण करण्यात आले. मुलीचा शोध घेतला असता तिच्या प्रियकरानेच तिचे अपहरण केल्याचे समजले. मिळालेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबर रोजी ही 17 वर्षीय तरुणी बदलापूर ते विक्रोळी लोकल ट्रेनने प्रवास करत होती. (Thane News 17-year-old girl was kidnapped from local Badlapur to Vikhroli She was found in Satara 250 km from Thane)

मात्र, ती घरी न पोहोचल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. तरुणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तिचा फोन बंद होता. यानंतर काळजीत पडलेल्या पालकांनी रडत पोलीस ठाणे गाठले. त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी एकटीच प्रवास करत होती. पण ती ना घरी पोहोचली ना तिच्याशी संपर्क होऊ शकला. माहितीनुसार, कुटुंबाने एका 19 वर्षीय मुलावर त्यांच्या मुलीचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे.

वाचा: “पती आणि दीर 10 महिन्यांपासून माझ्यासोबत…”, नवविवाहितेने सांगितली आपबीती

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. मुलीचा शोध सुरू केला. पोलिसांना त्या मुलाच्या मोबाईल नंबरवरून लोकेशन सापडले. लोकेशन ट्रेस केले असता ती ठाण्यापासून 250 किलोमीटर अंतरावर असलेल्या साताऱ्यात असल्याचे आढळून आले. तिचा शोध घेत पोलिसांनी सातारा गाठलं. त्यानंतर मुलीच्या कुटुंबाने ज्या मुलावर आरोप केले त्याच मुलाला साताऱ्यातील एका घरातून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी त्याला तात्काळ पकडले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा: Lalit Patil : एक कॉल अन् ललित पाटीलचा झाला ‘गेम’; मुंबई पोलिसांनी कसं पकडलं?

मुलीच्या शोधात पोलिसांनी सातारा गाठलं अन्…

पोलिसांनी घरात तपासलं असता तिथे ती 17 वर्षांची अल्पवयीन मुलगीही सापडली. पोलिसांनी तात्काळ मुलाला ताब्यात घेतले. मुलीलाही बाहेर काढून तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मुलीच्या म्हणण्यानुसार, मुलाने तिला फूस लावून सोबत नेले होते. तर, मुलगा म्हणतो की ती स्वतः त्याच्यासोबत गेली होती. दोघांचेही अफेअर असल्याचे दोघांच्या मित्रांचे म्हणणे आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT