Kalyan Crime: बार गर्ल दलाल, निवृत्त पोलिसाचा मुलगा अन्.. उल्हासनगरमध्ये घडलं भलतंच कांड!
बारगर्ल सप्लायरचे प्रोटेक्शन मनीसाठी गुंडाकडून अपहरण करुन त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याचवेळी त्याच्याकडे पैशाची मागणी करत पैसे दे नाही तर तुला ठार करु अशी धमकी देत गुंडांनी बारगर्ल सप्लायरचे अपहरण केले होते. मात्र त्यांना 30 हजार रुपये देऊन त्याने सहीसलामत सुटका करुन घेतली. मात्र आता धक्कादायक माहिती उघड होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT
Kidnapping Case: उल्हासनगर शहरातील विविध डान्सबारमध्ये बारगर्ल सप्लायर (Bargirl Supplier) करणाऱ्या तरुणाचे दरमहा 1 लाख रुपये प्रोटेक्शन मनीसाठी अपहरण केल्याचे समोर आल्याने पोलिसही चक्राहून गेले. विशेष म्हणजे बारगर्ल सप्लायर तरुण हा सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून तो एका मित्रांसोबत पाटर्नरशिपमध्ये (Partnership) बारगर्ल सप्लायरचा व्यवसाय (Business of bargirl supplier) करतो. त्याची खबर गुंडांच्या टोळीतील म्होरक्याला मिळाली होती. त्याने 3 साथीदारांच्या मदतीने त्याचे अपहरण करून जंगलात घेऊन जाऊन त्याला बेदम मारहाण (brutal beating) करण्यात आली होती. मात्र आपला जीव वाचवण्यासाठी गुंडांना 30 हजार रुपये देऊन त्यांच्या तावडीतून सुटका केली.
ADVERTISEMENT
टोळीच्या म्होरक्याची शक्कल
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अपहरणासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करताच पोलिसांनी या प्रकरणी एका गुंडाला अटक केली आहे. अजय बागुल असे अटक केलेल्या गुंडांचे नाव असून तोच टोळीचा म्होरक्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. देवा खेडेकर, आणि कुणाल वशिटा, साहिल बेद हे तिघे फरार असून पोलिसांसह उल्हासनगर गुन्हे शाखाचे पथक त्यांचा शोध घेत आहे.
हे ही वाचा >> Crime : घरात एकटाच होता 5 वर्षाचा मुलगा, आधी पॉर्न व्हिडीओ दाखवला आणि नंतर…
बारबालांचा पुरवठा
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार दुर्गेश कैलास वारे हा उल्हासनगरच्या म्हारळ गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील कैलास वारे हे सेवानिवृत्त पोलीस हवालदार आहेत. तर दुर्गेश हा डान्सबारमध्ये बारबालांचा पुरवठा करण्याचा व्यवसाय त्याचा मित्र उत्तम याच्यासोबत पाटर्नरशिपमध्ये करीत आहे. तर टोळीचा म्होरक्या देवा हा विठ्ठलवाडी भागात राहता असून तो दुहेरी हत्याकांडाच्या शिक्षा भोगत असताना काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला.
हे वाचलं का?
प्रोटेक्शन मनीसाठी धमकी
टोळीचा म्होरक्या देवा हा राहत असलेल्या भागात दहशत पसरवून हॉटेल मालक, व्यापारी अन्य व्यवसाय करणाऱ्यांना प्रोटेक्शन मनीसाठी धमकी देत होता. त्यावेळी 11 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा तक्रारदार दुर्गेश हा उल्हासनगर येथील पॅराडाईज हॉटेलच्या बाहेर उभा होता, त्यावेळी देवा आला आणि त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून शहाड स्थानकाच्या दिशेने घेऊन गेला. त्यानंतर त्याला दुसऱ्या वाहनातून कांबा गावानजीक जंगलात घेऊन जाऊन देवा खेडकरने त्याच्या अन्य तीन मित्रांसह दुर्गेशला रात्री 3 वाजेपर्यंत हॉकी स्टिकने बेदम मारहाण केल्यानंतर एक लाख रुपयांची मागणी करून तुला व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील, अन्यथा तुला मारून टाकू अशी धमकी देण्यात आली.
रागाने कार फोडली
या धमकीला घाबरून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी दुर्गेशने अपहरणकर्त्यांना सांगितले की, माझ्याकडे इतके पैसे नाहीत, मी आता फक्त 30 हजार रुपये देऊ शकतो. असे बोलून गुंड टोळीला सांगतिल्याने त्यांनी त्याला उल्हासनगर येथील एका बारजवळ आणलं. त्यानंतर बारच्या काउंटरवरून 30 हजार रुपये अपहरणकर्त्यांना देण्याचे मॅनेजरला सांगितले. 30 हजार रुपये दिल्यानंतर अपहरणकर्त्यांनी दुर्गेशला सोडून दिले. आणि पोलिसांना काहीही न सांगण्याची धमकी दिली. तसेच दुर्गेशची कार फोडून त्याचा व्हिडिओ बनवला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> MLA Disqualification : ‘शेवटची संधी देतोय’, सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांवर संतापले
गुंड फरार
दरम्यान, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर दुर्गेशने तक्रार देण्यासाठी मध्यवर्ती पोलिस स्टेशन गाठून देवा खेडकर, कुणाल वशिटा, साहिल बेद, अजय बागुल यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी 13 ऑक्टोबर रोजी 4 पैकी अजय बिगुल याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. तर उर्वरित अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक ठिकठिकाणी छापे टाकत असल्याचे सांगून या आरोपींनी लवकरच आम्ही त्यांना अटक करू अशी माहितीही देण्यात आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT