पत्नीने केले आयब्रो अन् मोडला संसार! नवरा बायकोत नेमकं काय बिनसलं?
उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जी ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. एका शुल्ल कारणावरून पती-पत्नीचा संसार मोडला आहे. प्रकरण असं आहे की, सौदी अरेबियातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला.
ADVERTISEMENT
UP Kanpur Talaq Case : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जी ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. एका शुल्ल कारणावरून पती-पत्नीचा संसार मोडला आहे. प्रकरण असं आहे की, सौदी अरेबियातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला. बोलत असताना पत्नीने आयब्रो केल्याचं पतीच्या लक्षात आलं, त्याने ते पाहिलं. यामुळे तो इतका नाराज झाला की त्याने व्हिडीओ कॉलवरच तीन वेळा तलाक (Tripple Talaq) म्हणत तिला सोडलं. आता पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह आणखी पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. (UP Kanpur Talaq Case Husband gave Talaq because his wife did eyebrows)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कानपूरच्या कुली बाजार परिसरातील आहे. येथे 17 जानेवारी 2022 रोजी गुलसबाचा विवाह प्रयागराज येथील सलीमसोबत झाला होता. सलीम सौदी अरेबियात काम करतो. लग्नानंतर तो 30 ऑगस्ट 2023 रोजी पुन्हा सौदीला गेला. यानंतर पती-पत्नीचे फोनवर बोलणे सुरू झाले.
वाचा: Manoj Jarange : ‘मुंबई सोडू नका, आरक्षण…’, जरांगे पाटलांनी आमदारांना केली विनंती
पती सौदीला गेल्यानंतर सासरच्यांनी केला छळ!
गुलसबाने आरोप केला आहे की, ‘सलीम सौदीला गेल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला. गाडीची मागणी करू लागले. सलीम जुन्या विचारांचा आहे, त्याला फॅशनच्या बाबतीतही समस्या आहेत. असेही तिने सांगितले. हे सर्व पाहून गुलसाबा कानपूरला येऊन राहू लागली होती.
हे वाचलं का?
वाचा: Manoj Jarange : ‘मुंबई सोडू नका, आरक्षण…’, जरांगे पाटलांनी आमदारांना केली विनंती
‘सांगितलं होतं ना आयब्रो करू नको’- सलीम प्रचंड चिडला
गुलसबा म्हणाली की, “मी आयब्रो करण्याला माझा पतीचा आधीपासूनच विरोध होता. पण मला वाटलं की तो एक पती आहे आणि अशा प्रकारची नाराजी तर नात्यात सुरूच असते. 4 ऑक्टोबर 2023 रोजी मी आणि सलीम व्हिडीओ कॉलवर बोलत होतो. त्याने (सलीम) माझ्या चेहऱ्याकडे बघितले आणि म्हणाला, तू आयब्रो केल्या आहेत का? यावर मी म्हणाली, ‘माझा चेहरा खराब दिसत होता. म्हणूनच मी आयब्रो सेट केल्या. नंतर तो प्रचंड चिडला आणि म्हणाला, माझ्या नकारानंतरही तू हे का केलंस? आजपासून मी तुला लग्नाच्या बंधनातून मुक्त करत आहे.”
गुलसबाने पुढे सांगितले की, “हे सर्व सांगितल्यानंतर सलीमने व्हिडीओ कॉलवरच तीनदा ‘तलाक’ दिला. आणि मग फोन डिस्कनेक्ट केला. त्यानंतर फोनही उचलला नाही. गुलसबाने सासरच्यांना बोलावून सर्व प्रकार सांगितल्यावर त्यांनी सलीमची बाजू घेतली.”
ADVERTISEMENT
वाचा: Maratha Reservation : ‘हल्ला झाला तेव्हा माझी पत्नी, मुलं…’, संदीप क्षीरसागरांनी सांगितलं हल्लेखोर कोण?
पती आणि कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल
बसई नाका एसपी निशंक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलसबाच्या तक्रारीवरून आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध बसना पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतरच अटक केली जाईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT