Crime: करायची होती हत्या पण संपवलं अख्ख कुटुंब... देशाला हादरवून सोडणारी घटना, घडलं काय?
Murder Case of Uttar Pradesh : पाल्हापूर हे उत्तर प्रदेशमधील सीतापूर येथील एक छोटंसं गाव आहे. जिथे 11 आणि 12 मे च्या मध्यरात्री हत्येचा रक्तरंजीत खेळ रंगला. एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतांमध्ये घरातील प्रमुख, त्याची पत्नी, आई आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

एकामागून एकाचा घेतला जीव

हत्या की आत्महत्या? कसं फुटलं बिंग?
Sitapur Murder Case of 6 people : त्याला फक्त एकच हत्या करायची होती. मात्र हत्या करताना त्याच्या आईने पाहिलं. यामुळे त्याने तिलाही संपवण्याचा निर्णय घेतला. आता दोघांचा जीव तर घेतलाच आहे इतरांनाही संपवून टाकूयात असा विचार त्याच्या मनात आला आणि यानंतर नराधमाने त्या घरातील तब्बल 6 जणांची एकामागून एक निर्घृण हत्या केली. याच हत्याकांडावेळी त्याने एक गोळी झाडली जी दोन जणांना लागली आणि या एका गोळीनेच संपूर्ण प्रकरणाचं बिंग फुटलं. उत्तरप्रदेशमधील सीतापूर येथे घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (uttar pradesh sitapur family murder case of 6 people the truth was revealed from the postmortem report)
'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
पाल्हापूर हे उत्तर प्रदेशमधील सीतापूर येथील एक छोटंसं गाव आहे. जिथे 11 आणि 12 मे च्या मध्यरात्री हत्येचा रक्तरंजीत खेळ रंगला. एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतांमध्ये घरातील प्रमुख, त्याची पत्नी, आई आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.
एकामागून एकाचा घेतला जीव
हत्या करणाऱ्या नराधमाला सुरुवातीला एकच खून करायचा होता, असं पोलीस तपासात उघड झालं. मात्र त्याक्षणी मृत व्यक्तीच्या आईने पाहिलं त्यामुळे नराधमाने तिचाही जीव घेतला. दोघांच्या हत्येनंतर तिसऱ्याला का सोडायचं? असं जेव्हा नराधमाला वाटलं तेव्हा त्याने त्याच्या पत्नीलाही ठार केलं. घरात आजूबाजूला जेव्हा आवाज त्यावेळी झोपलेली 12 वर्षीय चिमुरडी जागी झाली. आई, आजी आणि वडिलांना मरताना तिने स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं. मारेकऱ्याचा चेहराही ओळखीचा होता. मग काय? पुरावा नष्ट करण्यासाठी नराधमाने या मुलीवरही गोळी झाडली आणि तिचा जीव घेतला.
हेही वाचा: 'मोदी देशाचे प्रमुख आहेत पण...', पवारांनी वर्मावरच ठेवलं बोट
यानंतर त्याच्या मनात आलं की, आता एका मुलीची हत्या केली आहे, तर दुसऱ्या दोन मुलांना तरी का ठेवायचं? यानंतर त्याने उरलेल्या दोन मुलांच्या डोक्यावर हातोड्याने वार केले आणि शेवटी त्यांच्या हत्येनंतर तीनही मुलांना एक एक करून छतावरून फेकून दिलं. मात्र यासोबतच हत्येशी संबंधित एक मोठा पुरावा मिळाला.