Crime : पत्नीचे भाच्यासोबतच संबंध, मुंबईला गेली पळून; पतीने लेकरांना दिली विषारी बिस्किटं अन्…
Crime news in marathi : पत्नीचे भाच्यासोबत विवाहबाह्य संबंध असून, दोघेही मुंबईला पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पतीने तीन मुलांना मारण्याचा प्रयत्न केला. तर स्वतः विष पिऊन आत्महत्या केली.
ADVERTISEMENT
Extra Marital Affair Crime News in Marathi : महिलेचे भाच्यावर प्रेम जडले. नवरा आणि तीन मुलांना सोडून महिला भाच्यासोबत मुंबईला पळून गेली. हे जेव्हा पतीला कळलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हा धक्का सहन न झाल्याने पतीने तीन चिमुकल्यांना विषारी बिस्किटं दिली अन् स्वतःही विषाचा घोट घेतला. (husband fed poison to three children and committed suicide after know that wife have extramarital affair with Nephew.)
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एका महिलेने आपल्या पतीची फसवणूक करून भाच्यासोबतच प्रेमसंबंध ठेवल्याची घटना समोर आली. इतकंच नाही तर ती तिन्ही मुलं आणि पतीला सोडून भाच्यासोबत मुंबईला पळून गेली. हा प्रकार पतीला समजताच तो अस्वस्थ झाला. मुलांना विषारी बिस्किटे खाऊ घातली. त्यानंतर त्याने स्वतः विष प्राशन केले. या घटनेत पतीचा मृत्यू झाला, तर मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.
मामी-भाच्यासोबत फरार… प्रकरण नेमकं काय?
हे प्रकरण राणीपूर परिसरातील निजामपूर गावचे आहे. व्यवसायाने मजूर असलेले धरमचंद पत्नी आणि तीन मुलांसह येथे राहत होते. मजुरीच्या कामासाठी ते अनेकदा घराबाहेर असायचे. दरम्यान, धरमचंद यांच्या पत्नीचे त्यांच्या भाच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. दरम्यान, 15 दिवसांपूर्वी त्यांची पत्नी तीन निरागस मुलांना सोडून भाच्यासोबत मुंबईला पळून गेली.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> शेती करताना मालकासोबतच जुळले सूत, वहिनीच्या विवाहबाह्य संबंधामुळे दिराचा गेला जीव
ही बाब धरमचंद यांना समजताच त्यांना धक्काच बसला. हा प्रकार त्यांच्या जिव्हारी लागला. काही दिवस ते एकटे आणि गप्प राहिले. मात्र काल रात्री म्हणजेच रविवारी (२९ ऑक्टोबर) रात्री धरमचंदने आपल्या तीन मुलांना बोलावून घेतले. त्यांना बिस्किटे खायला दिली. निष्पाप मुलांनी विचार न करता बिस्किटे खाल्ली. मात्र बिस्किटे खाल्ल्याबरोबर त्यांची प्रकृती ढासळू लागली. कारण धरमचंद यांनी बिस्किटांमध्ये विष मिसळले होते.
धरमचंदचा तडफडून मृत्यू…
दरम्यान, धरमचंद यांनी स्वतःही विष प्राशन केले. त्यांना मुलांची हत्या करून स्वतःचे जीवन संपवायचे होते. विषाचा परिणाम होऊन चौघांची प्रकृती ढासळू लागल्यावर ते सगळे आरडाओरड करू लागले. त्यांचा आवाज ऐकून शेजारी आले. चौघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान धरमचंदचा तडफडून मृत्यू झाला. तर तिन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> NCP : ‘अपात्र का करू नये?’, शरद पवारांच्या 8 नेत्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार!
हृतिक (12 वर्षे), छाया (7 वर्षे) आणि मुस्कान (4 वर्षे) या तीन मुलांना खात असलेली बिस्किटे विषारी असल्याचे माहीत नव्हते. वडिलांनी बिस्किट दिल्यावर त्यांनी ती आनंदाने खाल्ली. आता ते तिघेही मृत्यूशी झुंज देत आहेत.
ADVERTISEMENT
एसपींनी मुलांच्या प्रकृतीचा घेतला आढावा
दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच बहराइचचे एसपी प्रशांत वर्मा यांच्यासह पोलीस अधिकारी पयागपूर आणि एसपी सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी मुलांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, कौटुंबिक तणावामुळे या मुलांचे वडील धरमचंद यांनी आपल्या मुलांना विष पाजले आणि स्वतः विष प्राशन केले. धरमचंद यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT