Crime: गुप्त फोन, प्रियकर अन्… जमिनीत पुरलेला मृतदेह काढला बाहेर; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
प्रेमप्रकरणातून वाद होऊन हत्येचा घटना गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका प्रियकराची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर त्याचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला होता.
ADVERTISEMENT
प्रेमप्रकरणातून वाद होऊन हत्येचा घटना गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका प्रियकराची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर त्याचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला होता. या घटनेची काही एक कल्पना मुलाच्या कुटुंबियांना नव्हती. मात्र हत्येच्या घटनेनंतर एक अज्ञात फोन कॉल आला आणि या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला होता. दरम्यान हे नेमके घटनाक्रम काय आहे, हे जाणून घेऊयात. (young boy killed girlfriend family love affair chhapara bihar crime story)
ADVERTISEMENT
या घटनेत हत्या झालेल्या मुलाचे नाव कुणाल होते. कुणालचे त्याच्याच गावातील एका तरूणीसोबत प्रेमप्रकरण होते. या प्रेमप्रकरणाची माहिती दोघांच्याही कुटुंबाला लागली होती. त्यामुळे या प्रेमप्रकरणामुळे दोन्ही कुटुंबियामध्ये वाद झाला होता. या वादात दोन्ही कुटुबियांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काहीसा वाद शमला होता. मात्र हे प्रकरण पुढे जाऊन इतक्या टोकाला जाईल,याची कल्पना देखील कोणी केली नव्हती.
हे ही वाचा : Mumbai Crime: वृद्ध दाम्पत्याच्या तोंडाला पट्टी लावली, हात-पाय बांधले…चोरीच्या घटनेनंतर घडली भयंकर घटना
त्याचं झालं असं की, दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद झाल्यानंतर देखील कुणाल आणि त्याची प्रेयसी लपून-छपून एकमेकांना भेटायचे. अशा भेटी सुरू असताना एके दिवशी कुणाल अचानक गायब झाला होता.त्यामुळे कुटुंबियांना
कुणाल गावातल्या तरूणीसोबत पळाल्याचा संशय होता. मात्र अनेक दिवस उलटून देखील तो घरी न परतलाग व त्याचा फोन लागत नसल्याने कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठून कुणाल बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कुणालचा तपास सुरू केला होता
हे वाचलं का?
फोन कॉलने हत्येचा उलगडा
कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना अज्ञात नंबरवरून एक फोन कॉल आला होता. या फोन कॉलमध्ये कुणालची हत्या करण्यात आली आहे आणि त्याचा मृतदेह नदी किनारी पुरल्याची माहिती दिली होती. कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांना देऊन घटनास्थळ गाठले होते. यावेळी पोलिसांना घटनास्थळावरून कुणालचा मृतदेह ताब्य़ात घेत, पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता.
हे ही वाचा : Nagpur Crime : … म्हणून त्याने सना खानशी केलं होतं लग्न, हत्येची Inside Story
या घटनेनतर कुणालच्या कुटुंबियांना त्याच्या प्रेयसीने तिच्याच कुटुंबियांनी हत्या केल्याची माहिती दिली होती.या माहितीनंतर कुणालच्या कुटुंबियांनी प्रेयसीच्या कुटुंबियांवरल कुणालच्या हत्येचा आरोप केला होता.कुटुंबियांच्या या आरोपानंतर पोलिसानी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा तपास सुरु केला आहे. बिहारमध्ये ही घटना घडली आहे , या घटनेने शहर हादरले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT