लग्नासाठी मुलगी बघायला आलेला तरूण, होणाऱ्या सासूलाच नेलं पळवून!
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील मालदा येथे एक तरुण लग्न करायचं म्हणून मुलगी पाहण्यासाठी आला होता. मात्र, त्यावेळी मुलीच्या आईलाच पळवून घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ADVERTISEMENT
Love Crime: मालदा (प. बंगाल): अरेंज मॅरेज म्हटलं की, मुलगी पाहण्याचा अगदी साग्रसंगीत कार्यक्रम आपल्याकडे पार पडतो. पण पश्चिम बंगालमधील (West Bengal) मालदा येथे मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमानंतर एक अशी घटना घडली आहे की, ज्यामुळे सर्वच जण चक्रावून गेले आहेत. त्याचं झालं असं की, एक तरुणाला लग्न करायचं होतं त्यामुळे तो मुलगी पाहण्यासाठी गेला. तिथे मुलाचा चांगला पाहुणचार देखील झाला. पण मुलाला मुलगी काही पसंत पडली नाही.. आता तुम्हाला वाटेल की.. जर मुलाला मुलगी पसंत नाही म्हणजे विषयच संपला… पण तसं अजिबात नाही.. यापुढे जे घडलं ते फारच चक्रावून टाकणारं आहे. त्या तरुण मुलाला लग्नासाठी मुलगी पसंत पडली नाही पण मुलीची आई मात्र त्याच्या मनात फारच भरली.. म्हणजे तरुण चक्क मुलीच्या आईच्याच प्रेमात पडला. (young man had gone to see girl for marriage fell in love with mother in law then ran away with her)
ADVERTISEMENT
यानंतर तरुणाने देखील मुलीच्या आईला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. आणि त्याच दिवशी तोच तरूण मुलीच्या आईला पळवून घेऊन गेला.
हे देखील वाचा- नातेवाईकासोबत अनैतिक संबंध, OYO हॉटेलमध्ये विवाहित महिलेसोबत घडली भयंकर गोष्ट
हा संपूर्ण प्रकार जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांना समजला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तर या घटनेनंतर परिसरातही एकच खळबळ उडाली. याप्रकरणी महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी महिला बेपत्ता झाल्याची नोंद करून तिचा आणि तरूणाचा शोधही सुरू केला आहे.
हे वाचलं का?
नेमकं प्रकरण काय?
प. बंगालच्या मालदातील गजोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करकच पंचायतीच्या इचाहार गावात 25 मार्च रोजी ही घटना घडली होती. महिलेचा पती गजोल याने आपल्या बायकोचा बऱ्याच ठिकाणी जाऊन शोध घेतला. मात्र, ती आतापर्यंत सापडू शकलेली नाही.
हे देखील वाचा- तरुणीसोबत लॉजमध्ये गेला व्यापारी, नंतर रुममध्ये मृतदेहच मिळाला… नेमकं काय घडलं?
याबाबत गजोल याने माहिती देताना सांगितलं की, ‘माझी मुलगी लग्नाच्या वयाची झाल्याने मी तिच्यासाठी अनेक दिवसांपासून वर शोधत होतो. 25 मार्च रोजी एक तरुण माझ्या मुलीसोबत लग्न करायचं म्हणून तिला पाहायला आला होता. मात्र, तो माझ्या बायकोलाच घेऊन फरार झाला. मात्र, जसजसा काळ सरत आहे, तसतशी माझी चिंता वाढत आहे. कारण माझ्या बायकोबद्दल अद्यापही कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही.’
ADVERTISEMENT
हे देखील वाचा- विकृत नवरा.. बायकोचे बेडरुममधील प्रायव्हेट व्हिडीओ केले शेअर, कारण…
तीन मुलांना सोडून आपल्या मुलीला पाहण्यासाठी आलेल्या तरुणासोबत ही महिला पळून गेल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर महिलेचा पती तिचा फोटो घेऊन सध्या गावोगाव फिरत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT