धक्कादायक! कांदिवलीत डॉक्टर कुटुंबातील 2 जणांची हत्या तर दोघांची आत्महत्या

कांदिवली पश्चिममधिल दळवी हॉस्पिटल येथे राहणाऱ्या डॉक्टरच्या कुटुंबातील दोघांची हत्या करण्यात आली आहे.
Kandivali Crime News
Kandivali Crime News(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: कांदिवली पश्चिममधिल दळवी हॉस्पिटल येथे राहणाऱ्या डॉक्टरच्या कुटुंबातील दोघांची हत्या करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या पत्नी आणि त्यांच्या मोठ्या मुलीची धारदार शस्त्रांनी हत्या केली आहे. त्याचबरोबर लहान मुलगी आणि ड्रायव्हरने आत्महत्या केली आहे. डॉक्टर आपल्या मुलासह इंदूरमध्ये आहेत. कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. कांदिवली पश्चिमच्या दळवी रोडवरती, सह्याद्री हॉटेलच्या मागे दळवी हॉस्पिटल आहे. जे गेल्या 15 वर्षांपासून बंद आहे, पण त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची पत्नी किरण दळवी (45 वर्षे), मुस्कान (26 वर्षे), कुमारी भूमी दळवी (16 वर्षे) राहत होते.

हे रुग्णालय गेल्या 15 वर्षांपासून बंद होते. 10 वर्षांपासून शिवदयाल सेन हा त्यांचा ड्रायव्हर त्यांच्यासोबत राहत होता. महिलेचा पती आशिष दळवी हे मध्य प्रदेशातील इंदूर येथे मुलासोबत राहतात. 29 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना फोन आला. सह्याद्री हॉटेलच्या पाठीमागे कोणचा तरी मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे. पोलिसांना खबर मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस मुख्य गेटचे ग्रील तोडून आत पोचले. प्रथम ड्रायव्हर आणि 16 वर्षांच्या मुलीचा मृतदेह लटकवलेल्या अवस्थेत आढळला.

पडलेल्या रक्ताचा पाठलाग करून पोलीस दुसऱ्या घरात पोहोचले. तेव्हा तिथे एक 45 वर्षांची महिला आणि एक 26 वर्षांची मुलीचा मृतदेह आढळला. त्यांच्या अंगावर अनेक जखमा होत्या. कांदिवली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून 4 सुसाईड नोट सापडल्या आहेत ज्यात 2 ड्रायव्हर आणि एका 16 वर्षाच्या मुलीच्या नावाने लिहिलेले आहे. मृत महिलेचे नाव किरण दळवी वय 45 वर्ष, मुस्कान 26 वर्ष, चालक शिवदयाल सेन वय 60 असे आहे.

पोलिसांनी मृत शिवदयाल सेन यांच्या खिशातून सापडलेल्या सुसाईड नोटवरून कौटुंबिक वाद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे व्यथित होऊन चालक शिवदयाल सेन आणि अल्पवयीन मुलीने मिळून आई किरण व मुस्कान यांची हत्या केली, त्यानंतर दोघांनी स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी डॉ.आशिष दळवी हे इंदूर येथील राहणारे असून त्यांना बोलावून घेतले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in