Lok Sabha Election 2024 : रायगडची लढत ठरली! तटकरे विरूद्ध गितेंमध्ये होणार सामना

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ajit pawar declare raigad lok sabha candidate sunil tatkare vs anant gite udhhav thackeray shiv sena maharashtra politics
अजित पवारांनी रायगड लोकसभा मतदार संघातून सुनील तटकरेंच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
social share
google news

Raigad Lok sabha Constituency, Sunil Tatkare vs Anant Gite : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. अजित पवारांनी रायगड लोकसभा मतदार संघातून सुनील तटकरेंच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) या घोषणेनंतर आता रायगड लोकसभेची लढत ठरली आहे. कारण आता रायगड लोकसभा मतदारसंघातून (Raigad Lok sabha) सुनील तटकरे (Sunil Tatkare) विरूद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे अनंत गिते यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे आता या जागेवर महायूती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. 

अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहिती दिली. तसेच या तीन उमेदवारांपैकी एका उमेदवाराचे नाव  अजित पवार यांनी घोषित केले होते. रायगडमधून सुनील तटकरे उमेदवार असणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली होती. 

हे ही वाचा : Prakash Ambedkar : मविआ 'वंचित'ला देणार 'इतक्या' जागा; चेंडू ठाकरे-पवारांच्या कोर्टात

दरम्यान रायगड लोकसभा मतदार संघात थेट महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. तर महाविकास आघाडीच्या जागावाटपात रायगड लोकसेभेचा मतदार संघ हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येतो. त्यामुळे उद्धव ठाकरे या जागेवर अनंत गिते यांना मैदानात उतरवणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा एक-दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे विरूद्द अनंत गिते अशी लढत होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अजित पवारांनी आज सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर बारामतीतून सुनेत्रा पवार  निवडणूक लढवणार आहेत. शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार असणार आहेत. अजित पवारांनीच याला दुजोरा दिला आहे. महायुतीचे जागावाटपाची घोषणा 28 मार्च रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे. 

हे ही वाचा : अजित पवार खरंच सुप्रिया सुळेंविरोधातील उमेदवार बदलणार?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT