Beed Lok Sabha Elections Results 2024 : मुंडेंचा बालेकिल्ला ढासळला! पंकजां मुंडेंचा निकाल काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनवणे यांनी पराभव केला.
बीड लोकसभा निवडणूक निकाल २०२४ : पंकजा मुंडे यांचा पराभव.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीड लोकसभा मतदारसंघ निकाल २०२४

point

पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव

point

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे विजयी

Beed Lok Sabha Elections Results 2024 Latest News, Pankaja Munde, bajrang sonawane : रात्री उशिरापर्यंत सगळ्यांची धडधड वाढवणाऱ्या लोकसभा मतदारसंघाचा निकाल अखेर आला. भाजपच्या पंकजा मुंडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात लढत होती. सोनवणे यांनी बीडमध्ये गुलाल उधळला. 

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपला जबर झटका बसला असून, पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. बीड लोकसभा मतदारसंघात रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.

हेही वाचा >> महाराष्ट्रात भाजपच्या चार मंत्र्यांचा दारूण पराभव 

मतमोजणीच्या सुरूवातीपासून बीड लोकसभा मतदारसंघात कडवी लढत बघायला मिळाली. पंकजा मुंडे काही फेऱ्यांअखेर आघाडी घेतली होती. तर काही वेळा बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. त्यामुळे बीडचा निकाल काय लागणार याची उत्कंठा वाढली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सर्व मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी निकाल घोषित केला. पंकजा मुंडे यांचा बंजरंग सोनवणे यांनी ६ हजार ५८५ मतांनी पराभव केला. पंकजा मुंडे यांना ६ लाख ७४ हजार ९८४ मते मिळाली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना ६ लाख ८१ हजार ५६९ मते मिळाली. 

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांमधील विजयी उमेदवार

1) दक्षिण मुंबई –
अरविंद सावंत – ठाकरे गट

ADVERTISEMENT

2) दक्षिण मध्य मुंबई –
अनिल देसाई – ठाकरे गट

ADVERTISEMENT

3) उत्तर पश्चिम मुंबई –
अमोल कीर्तीकर – ठाकरे गट

4) बुलढाणा –
प्रतापराव जाधव – शिंदे गट

5) ठाणे –
नरेश म्हस्के – शिंदे गट

6) कल्याण –
श्रीकांत शिंदे – शिंदे गट

7) नाशिक –
राजाभाऊ वाजे – ठाकरे गट

हेही वाचा >> Devendra Fadnavis Lok Sabha Results 2024 : "...तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती"

8) औरंगाबाद –
संदीपान घुमरे – शिंदे गट

9) हिंगोली –
नागेश पाटील – ठाकरे गट

10) यवतमाळ –
संजय देशमुख – ठाकरे गट

11) हातकणंगले –
धैर्य़शील माने – शिंदे गट

12) मावळ –
श्रीरंग बारणे – शिंदे गट

13) शिर्डी –
भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट

14) बारामती –
सुप्रिया सुळे – शरद पवार गट

15) शिरुर –
डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट

16) उत्तर मुंबई –
पियूष गोयल – भाजप

17) उत्तर मध्य मुंबई –
वर्षा गायकवाड – काँग्रेस

18) नंदुरबार –
गोवाल पाडवी– काँग्रेस

19) धुळे –
डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस

20) जालना –
कल्याण काळे – काँग्रेस

21) लातूर –
शिवाजीराव काळगे – काँग्रेस

22) नांदेड –
वसंत चव्हाण – काँग्रेस

23) अकोला –
अनुप धोत्रे – भाजप

24) अमरावती –
बळवंत वानखेडे – काँग्रेस

25) नागपूर –
नितीन गडकरी – भाजप

26) भंडारा-गोंदिया –
प्रशांत पडोले– काँग्रेस

27) गडचिरोली –
डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस

28) चंद्रपूर –
प्रतिभा धानोरकर – काँग्रेस

29) पुणे –
मुरलीधर मोहोळ – भाजप

30) सोलापूर –
प्रणिती शिंदे – काँग्रेस

31) भिवंडी –
बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट

32) दिंडोरी –
भास्करराव भगरे – शरद पवार गट

33) रावेर –
रक्षा खडसे – भाजप

34) बीड –
बजरंग सोनवणे– भाजप

35) वर्धा –
अमर काळे– शरद पवार गट

36) माढा –
धैर्यशील पाटील – शरद पवार गट

37) सातारा –
उदयनराजे भोसले – भाजप

38) अहमदनगर –
निलेश लंके – शरद पवार गट

39) मुंबई उत्तर पूर्व –
संजय दिना पाटील – ठाकरे गट

40) पालघर –
डॉ. हिमंत सावरा – भाजप

41) सिंधुदुर्ग –
नारायण राणे – भाजप

42) जळगाव –
स्मिता वाघ – भाजप

43) सांगली –
विशाल पाटील – अपक्ष

44) रायगड –
सुनील तटकरे– अजित पवार गट

45) धाराशिव –
ओमराजे निंबाळकर – ठाकरे गट

46) परभणी –
संजय जाधव – ठाकरे गट

47) रामटेक –
श्यामकुमार बर्वे – काँग्रेस

48) कोल्हापूर –
शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस

    follow whatsapp

    ADVERTISEMENT