Lok Sabha Election 2024 : भाजपने दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचं तिकीट कापलं!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

bjp declare second list of lok sabha elction 2024 pankaja munde gopal shetty kalaben delkar candidate ticket cut
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे.
social share
google news

BJP declare second list,lok sabha elction 2024  : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलं आहे.यामथ्ये भाजपचे बडे नेते गोपाळ शेट्टीचं यांच तिकीच कापण्यात आलं आहे. गोपाळ शेट्टीसह प्रितम मुंडे यांचंही तिकीट तिकीट कापण्याात आलं आहे. (bjp declare second list of lok sabha elction 2024 pankaja munde gopal shetty kalaben delkar candidate ticket cut) 

भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 नेत्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामधील 14 उमेदवारांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. तर 6 नवीन उमेदवार मैदानात उतरवले आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. 

'या' नेत्यांचा पत्ता कट 

भाजपने दुसऱ्या यादीत अनेक दिग्गज नेत्यांची तिकीट कापली आहेत.  उत्तर मुंबईमधून गोपाळ शेट्टीचं तिकीट कापलं आहे,त्यांच्याजागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर  बीडमधून पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आल्याने प्रितम मुंडेंच तिकीट कापण्यात आले आहे. जळगावमधून उन्मेष पाटीलचं तिकीट कापून त्यांच्याजागी स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलं आहे. चंद्रपूरमधून हंसराज अहिरांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यांच्याजागी सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट दिले आहे. दादरा नगर हवेलीतून कलाबेन डेलकरला तिकीट कापण्यात आलं आहे.अकोल्या संजय धोत्रे यांच्याजागी त्यांचा मुलगा अनुप धोत्रेला तिकीट दिले गेले आहे. ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांचा पत्ता कट करत  मिहीर कोटेचा यांना तिकीट देण्यात आलं आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील 'या' नेत्यांना उमेदवारी 

चंद्रपुर-सुधीर मुनगंटीवार
रावेर- रक्षा खडसे 
जालना- रावसाहेब दानवे 
बीड- पंकजा मुंडे
पुणे- मुरलीधर मोहोळ 
सांगली - संजय काका पाटील 
माढा - रणजित निंबाळकर 
धुळे- सुभाष भामरे 
उत्तर मुंबई-पियुष गोयल
उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा 
नांदेड - प्रतापराव चिखलीकर
अहमदनगर- सुजय विखे पाटील 
लातूर- सुधाकर श्रृंगारे  
जळगाव - स्मिता वाघ 
दिंडोरी- भारती पवार 
भिवंडी -कपिल पाटील 
वर्धा- रामदास तडस 
नागपूर- नितीन गडकरी
अकोला- अनुप धोत्रे
नंदुरबार- डॉ. हिना गावित 

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT