Lok Sabha Elections 2024: अवघ्या देशाचे महाराष्ट्राकडे डोळे, 'हे' ओपिनियन पोल अन् भाजपचं वाढलं टेन्शन!

मुंबई तक

ADVERTISEMENT

'हे' ओपिनियन पोल अन् वाढलं भाजपचं टेन्शन!
'हे' ओपिनियन पोल अन् वाढलं भाजपचं टेन्शन!
social share
google news

Lok Sabha Elections 2024 Opinion Poll: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी आहे. याआधी जाहीर झालेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला काही राज्यांमध्ये मोठा धक्का बसत असल्याचं दिसत आहे. राजस्थानमध्ये भाजपला अनेक जागा गमवाव्या लागू शकतात. त्याचवेळी पश्चिम बंगाल, बिहारमध्येही काही प्रमाणात भाजप आणि एनडीएला फटका बसू शकतो. मात्र, अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रात भाजप आणि एनडीए नेमकी परिस्थिती काय असू शकते याबाबत आता अनेक सर्व्हेतून महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. (lok sabha elections 2024 all the eyes of country towards maharashtra many opinion polls increased bjp tension)

लोकपोल सर्वेक्षणानुसार, पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला 26-28, काँग्रेसला 2-4 आणि भाजपला 11-13 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

लोकपोल सर्वेक्षणात सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात इंडिया आघाडीला 23 ते 26 जागा, आणि भाजप-NDA युतीला 21 ते  26 जागा मिळू शकती असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असं झाल्यास हा भाजपसाठी मोठा धक्का असू शकतो. कारण 2019 लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतील तब्बल 41 जागा मिळाल्या होत्या. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

ABP CVoter सर्वेक्षण मध्ये इंडिया आघाडीला महाराष्ट्रात 20 जागा मिळतील असा अंदाज असून त्यांना 42 टक्के मते मिळतील असाही अंदाज आहे. त्याचवेळी भाजप-एनडीए युतीला 43 टक्के मतांसह 28 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे.

हे ही वाचा>> 'ईडी एकदम..', PM मोदी ED-CBI वर नेमकं म्हणाले काय?

टाईम्स नाऊ ईटीजीनुसार, महाराष्ट्रात NDA ला 34-38 तर इंडिया आघाडीला 9-13 जागा मिळू शकतात. तर इंडिया टीव्ही CNX च्या सर्वेक्षणात NDA ला 53 टक्के मतांसह 35 जागा मिळतील आणि इंडिया आघाडीला 35 टक्के मतांसह 13 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT

इंडिया टुडे मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात NDA आघाडीला 40.5 टक्के मतांसह 22 जागा मिळतील तर इंडिया आघाडीला 44.5 टक्के मतांसह 26 जागा मिळतील. असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ओपनियन पोलनुसार भाजपला बसू शकतो मोठा धक्का? 

या सगळ्या ओपिनियन पोलचा विचार केल्यास महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण 2019 मध्ये भाजपने शिवसेनेसोबत मिळून 41 जागांवर विजय मिळवला होता. पण आता सर्व पोलचा विचार केला तरीही तेवढ्याच जागा मिळविण्यात भाजप-एनडीएला यश मिळत नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे ही वाचा>> Opinion Poll: BJPला 'इथे' शून्य जागा, पण मोदी म्हणतात..

लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल

महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीचा भाग होते. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात फूट पडली नव्हती. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या एनडीए युतीला 41 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी 23 जागा भाजपच्या वाट्याला तर 18 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा तर काँग्रेसला एक जागा मिळाली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT