Lok Sabha Opinion Poll : काँग्रेसला 15 ते 17 जागा, भाजपला बसणार जबर फटका?

मुंबई तक

ADVERTISEMENT

कर्नाटकमध्ये भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे.
कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीचा ओपिनियन पोल
social share
google news

Latest Opinion Poll of Lok Sabha election : भाजपने लोकसभा निवडणुकीत 370 जागा जिंकण्याचा चंग बांधला असला, तरी त्यांना जिथे जास्त जागा मिळाल्या आहेत. तिथेच झटका बसणार असं दिसतंय. कारण ज्या राज्यात भाजपने 2019 मध्ये तब्बल 25 जागा जिंकल्या होत्या, तिथे निम्म्या जागा कमी होणार असा अंदाज आहे. त्यामुळे पोलचे आकडे काय सांगतात हे जाणून घ्या. (Latest Lok Sabha Opinion Poll 2024 of Karnataka) 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदींसह भाजपचे नेते प्रचारात उतरले आहेत. दुसरीकडे राहुल गांधी मल्लिकार्जून खरगे यांच्यासह काँग्रेसचे नेतेही प्रचारासाठी फिरताना दिसत आहे. भाजप आणि काँग्रेसने कर्नाटकातही लक्ष केंद्रित केलं आहे. 

लोकसभेच्या 28 जागा असलेल्या कर्नाटकात भाजपला यावेळी पिछेहाट होईल असे नव्याने आलेल्या ओपिनियनचे अंदाज आहेत. लोक पोलने कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीबद्दलचे ओपिनियन पोल जारी केले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजपच्या निम्म्या जागा घटणार?

लोकपोलने नवीन ओपिनियन पोल प्रसिद्ध केले आहे, त्यात भाजपलाच झटका बसताना दिसत आहे. या ओपिनियन पोलनुसार, कर्नाटकात काँग्रेसला 15 ते 17 जागा मिळू शकतात. तर भाजपला  11 ते 13 जागा मिळू शकतात.

हेही वाचा >>  महायुती की मविआ, कुणाचा होणार 'गेम'? धक्कादायक पोल 

अशा पद्धतीचे निकाल जर कर्नाटकातील आले, तर भाजपसाठी मोठा झटका असेल. कारण पक्षाने 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 25 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली होती, तर जनता दल संयुक्त ला 2 जागा मिळाल्या होत्या. इथे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, हे ओपिनियनचे पोलचे आकडे आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष निकाल वेगळेही लागू शकतात.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

लोकसभा 2014 चे चित्र काय होते?

2014 लोकसभा निवडणुकीत भाजपला कर्नाटकात सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला दहाच्या आतच जागा मिळाल्या होत्या. भाजपला 17 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 9 जागा मिळाल्या होत्या. तर जनता दल संयुक्त पक्षाने 2 जागा जिंकल्या होत्या.

हेही वाचा >> जयंत पाटलांनी 'आमचं ठरलंय' म्हणताच भाजपचं वाढलं टेन्शन! रात्रीत काय घडलं? 

कर्नाटकात भाजपच्या सत्तेचा अस्त

गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्येच कर्नाटकात विधानसभेची निवडणूक झाली. 224 जागा असलेल्या विधानसभेत काँग्रेसने बहुमत मिळवले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे 135 आमदार निवडून आले, तर भाजपचे 66. जनता दल संयुक्त पक्षाला 19 जागा मिळाल्या होत्या. चार जागा अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांनी जिंकल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत कर्नाटकातील जनता भाजपला किती समर्थन देते तेही बघावं लागणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT