Maharashtra Exit Poll: ठाकरे महाराष्ट्रात जिंकणार 'इतक्या' जागा, ही आहे संपूर्ण यादी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

rudra research exit poll om maharashra lok sabha shiv sena ubt udhhav thackeray group to win total 14 seats in maharashtra see the full list lok sabha election 2024
उद्धव ठाकरेंच्या बाजूने महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट होती.
social share
google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra Exit Poll Shiv Sena UBT : लोकसभा निवडणूक 2024 चा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये सर्वांच्या नजरा या महाराष्ट्रावर लागल्या होत्या. कारण महाराष्ट्रात जी राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) बाजूने महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट होती. या लाटेचं आता मतात किती रूपांतर झालं आहे. याचा अंदाज आपण एक्झिट पोलमधून घेऊयात. रुद्र रिसर्च (Rudra Research) या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 14 जागा मिळताना दिसत आहेत. त्यामुळे एक्झिट पोलनूसार ठाकरे जिंकत असलेल्या 'त्या' 14 जागा कोणत्या? या जाणून घेऊयात.  (rudra research exit poll om maharashra lok sabha shiv sena ubt udhhav thackeray group to win total 14 seats in maharashtra see the full list lok sabha election 2024)

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करत महाराष्ट्राची सत्ता काबिज केली होती. तर 2022 साली एकनाथ शिंदेंना हाताला धरून भाजपने शिवसेनेत बंड घडवून आणलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं. पण त्यांना तेवढाच फटका बसला नाही. तर त्यांच्याकडे असलेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील ते या सगळ्या राजकारणात गमावून बसले. सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. 

हे ही वाचा : फडणवीस-पवारांची प्रतिष्ठा पणाला, माढ्यात कोण उधळतंय गुलाल?

दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल हे चिन्ह घेऊन जनतेसमोर जावं लागणार आहे. अशावेळी महाराष्ट्रातील जनता ठाकरे गटाच्या पारड्यात किती जागा टाकतं याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एक्झिट पोलमध्ये 48 मतदारसंघात नेमकं कोण जागा जिंकणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रुद्र रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार, यंदाच्या निवडणुकीत राज्यात 48 पैकी 14 जागा या शिवसेना (UBT)ला मिळतील. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत ठाकरेंना बराचसा फटका बसताना दिसत आहे. 

रुद्र रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार,  शिवसेना (UBT)महाराष्ट्रातील कोणत्या जागा जिंकणार?

मुंबई उत्तर पश्चिम : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मुंबई उत्तर पूर्व : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मुंबई दक्षिण मध्य  : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मुंबई दक्षिण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
नाशिक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
बुलढाणा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
यवतमाळ वाशिम  : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
हिंगोली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
परभणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
 शिर्डी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
हातकणंगले :  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Solapur Lok Sabha : राम सातपुतेंबद्दल एक्झिट पोल काय सांगतो?

सर्व्हेनुसार, महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये हे उमेदवार होणार विजयी?

1. मुंबई उत्तर  
पियुष गोयल (भाजप) - जिंकू शकतात
भूषण पाटील (काँग्रेस) - पराभवाची शक्यता

ADVERTISEMENT

2. मुंबई उत्तर पश्चिम 
अमोल किर्तीकर (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता

3. मुंबई उत्तर पूर्व
संजय दिना पाटील  (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
मिहीर कोटेचा (भाजप) - पराभवाची शक्यता

4. मुंबई उत्तर मध्य 
वर्षा गायकवाड (काँग्रेस) - जिंकू शकतात
उज्ज्वल निकम (भाजप) - पराभवाची शक्यता

5. मुंबई दक्षिण मध्य - शिवसेना
अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता

6. मुंबई दक्षिण 
अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता

7. नंदूरबार
गोवाल पाडवी (काँग्रेस) - जिंकू शकतात
हिना गावित (भाजप) - पराभवाची शक्यता

8. धुळे
सुभाष भामरे (भाजप) - जिंकू शकतात
शोभा बच्छाव (काँग्रेस) - पराभवाची शक्यता

9. जळगाव
स्मिता वाघ (भाजप) - जिंकू शकतात
करण पवार (शिवसेना ठाकरे गट) - पराभवाची शक्यता

10. दिंडोरी
भास्कर भगरे (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
भारती पवार (भाजप) - पराभवाची शक्यता

11. नाशिक
राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता
शांतीगिरी महाराज (अपक्ष) - तिसऱ्या स्थानी

12. बुलढाणा
नरेंद्र खेडेकर (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
प्रताप जाधव (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता
रविकांत तुपकर (स्वाभिमानी शेतकरी पक्ष) - तिसऱ्या स्थानी

13. अकोला
अभय पाटील (काँग्रेस) - जिंकू शकतात 
अनुप धोत्रे (भाजप) - पराभवाची शक्यता
प्रकाश आंबेडकर (वंचित) - तिसऱ्या स्थानी

14. अमरावती
नवनीत राणा (भाजप) - जिंकू शकतात
बळवंत वानखेडे (काँग्रेस) - पराभवाची शक्यता
दिनेश बूब (प्रहार) - तिसऱ्या स्थानी

15. वर्धा
अमर काळे (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
रामदास तडस (भाजप)- पराभवाची शक्यता

16. रामटेक 
राजू पारवे (शिवसेना शिंदे गट) - जिंकू शकतात
श्यामकुमार बर्वे (काँग्रेस) - पराभवाची शक्यता
किशोर गजभिये (अपक्ष) - तिसऱ्या स्थानी

17. नागपूर 
नितीन गडकरी (भाजप) - जिंकू शकतात
विकास ठाकरे (काँग्रेस) - पराभवाची शक्यता

18. भंडारा-गोंदिया
प्रशांत पडोळे (काँग्रेस) - जिंकू शकतात
सुनील मेंढे (भाजप) - पराभवाची शक्यता

19. गडचिरोली चिमूर
नामदेव किरसान (काँग्रेस) - जिंकू शकतात
अशोक नेते (भाजप) - पराभवाची शक्यता

20. चंद्रपूर
प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) - जिंकू शकतात
सुधीर मुनगंटीवार (भाजप) - पराभवाची शक्यता

21. यवतमाळ वाशिम - शिवसेना
संजय देशमुख  (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
राजश्री पाटील (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता

22. हिंगोली
नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
बाबूराव कदम (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता
बी. डी. चव्हाण (वंचित) - तिसऱ्या स्थानी

23. नांदेड
वसंतराव चव्हाण (काँग्रेस) - जिंकू शकतात
प्रतापराव चिखलीकर (भाजप) - पराभवाची शक्यता
अविनाश भोसीकर (वंचित) - तिसऱ्या स्थानी

24. परभणी
संजय (बंडू) जाधव (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
महादेव जानकर (रासप) - पराभवाची शक्यता

25. जालना
कल्याण काळे (काँग्रेस) - जिंकू शकतात
रावसाहेब दानवे (भाजप) - पराभवाची शक्यता
मंगेश साबळे (अपक्ष) - तिसऱ्या स्थानी

26. छत्रपती संभाजीनगर
चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
संदिपान भुमरे (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता
इम्तियाज जलील (MIM) - तिसऱ्या स्थानी

27. धाराशिव
ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
अर्चना पाटील (NCP अजित पवार) - पराभवाची शक्यता

28. लातूर
शिवाजी काळगे (काँग्रेस) - जिंकू शकतात
सुधाकर श्रृंगारे (भाजप) - पराभवाची शक्यता

29. बीड
पंकजा मुंडे (भाजप) - जिंकू शकतात
बजरंग सोनावणे (NCP शरद पवार) - पराभवाची शक्यता

30. पालघर
हेमंत सावरा (भाजप) - जिंकू शकतात
भारती कामडी (शिवसेना ठाकरे गट) - पराभवाची शक्यता
राजेश पाटील (बविआ) - तिसऱ्या स्थानी

31. भिवंडी 
सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
कपिल पाटील (भाजप) - पराभवाची शक्यता
निलेश सांबरे (अपक्ष) - तिसऱ्या स्थानी

32. कल्याण
श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट) - जिंकू शकतात
वैशाली दरेकर (शिवसेना ठाकरे गट) - पराभवाची शक्यता

33. ठाणे
राजन विचारे (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता

34. रायगड
सुनील तटकरे (NCP अजित पवार) - जिंकू शकतात
अनंत गीते (शिवसेना ठाकरे गट) - पराभवाची शक्यता

35. मावळ
श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट) - जिंकू शकतात
संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे गट) - पराभवाची शक्यता

36. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
नारायण राणे (भाजप) - जिंकू शकतात
विनायक राऊत (शिवसेना ठाकरे गट) - पराभवाची शक्यता

37. पुणे
रवींद्र धंगेकर (काँग्रेस) - जिंकू शकतात
मुरलीधर मोहोळ (भाजप) - पराभवाची शक्यता
वसंत मोरे (वंचित) - तिसऱ्या स्थानी

38. बारामती 
सुप्रिया सुळे (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
सुनेत्रा पवार (NCP अजित पवार) - पराभवाची शक्यता

39. शिरूर 
अमोल कोल्हे - (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
शिवाजीराव आढळराव (NCP अजित पवार) - पराभवाची शक्यता

40. अहमदनगर
निलेश लंके (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
सुजय विखे (भाजप) - पराभवाची शक्यता

41. शिर्डी
भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता
उत्कर्षा रुपवते (वंचित) - तिसऱ्या स्थानी

42. रावेर
रक्षा खडसे (भाजप) - जिंकू शकतात
श्रीराम पाटील (NCP शरद पवार) - पराभवाची शक्यता

43. सोलापूर
प्रणिती शिंदे (काँग्रेस) - जिंकू शकतात
राम सातपुते (भाजप) - पराभवाची शक्यता

44. माढा
धैर्यशील मोहिते-पाटील (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
रणजीतसिंह निंबाळकर (भाजप) - पराभवाची शक्यता

45. सांगली
विशाल पाटील (अपक्ष) - जिंकू शकतात
संजयकाका पाटील (भाजप) - पराभवाची शक्यता
चंद्रहार पाटील (शिवसेना ठाकरे गट) - तिसऱ्या स्थानी

46. सातारा 
शशिकांत शिंदे (NCP शरद पवार) - जिंकू शकतात
उदयनराजे भोसले (भाजप) - पराभवाची शक्यता

47. कोल्हापूर 
शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) - जिंकू शकतात
संजय मंडलिक (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता

48. हातकणंगले
सत्यजीत पाटील (शिवसेना ठाकरे गट) - जिंकू शकतात
धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट) - पराभवाची शक्यता
राजू शेट्टी (शेतकरी स्वाभिमानी पक्ष) - तिसऱ्या स्थानी

महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? 

रुद्र रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीला राज्यात 48 पैकी तब्बल 34 जागा मिळू शकतील. ज्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 14 जागा जिंकू शकते, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागा आणि काँग्रेसला 12 जागांवर विजय मिळू शकतो असा अंदाज वर्तवला आहे.

तर महायुतीला राज्यात 48 पैकी केवळ 13 जागांवरच मिळू शकतो असा अंदाज रुद्र रिसर्चच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. ज्यामध्ये शिवसेना (शिंदे गट) यांना केवळ 3 जागा जिंकता येतील, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता येईल. तर भाजपला फक्त 9 जागांवर विजय मिळेल असं एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.

या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी 34 जागा, महायुती 13 जागा आणि एक जागा अपक्ष जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT