Lok Sabha Election 2024 : शरद पवारांचा PM मोदींना टोला! ''माझं बोट धरून राजकारणात आले, आता बोटाची काळजी...''
Sharad Pawar slams PM Narendra Modi : शरद पवारांच बोट धरून मी राजकारणात आलो, मला आता माझ्या बोटाची काळजी वाटायला लागली आहे. कारण माझ्या बोटाचा गैरफायदा कुणी असा घेत असेल, तर कठीण आहे, अशा शब्दात शरद पवारांनी मोदींवर टीका केली.
ADVERTISEMENT

Sharad Pawar slams PM Narendra Modi : ''शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो'', असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षापूर्वी केले होते. मोदींच्या या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. आता याच विधानावरून शरद पवार यांनी मोदींवर हल्ला चढवला आहे. ''मोदी म्हणाले, शरद पवारांच बोट धरून मी राजकारणात आलो, मला आता माझ्या बोटाची काळजी वाटायला लागली आहे. कारण माझ्या बोटाचा गैरफायदा कुणी असा घेत असेल, तर मामला कठीण आहे'', अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. (sharad pawar slams pm narendra modi on came into politics by holding my finger maharashtra politics pune news)
शरद पवार पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ''मोदी साहेबांचं वैशिष्ट्य वेगळं आहे. माझी आणि त्यांची वेगळी ओळखं आहे. त्यांनी एकदा बारामतीत येऊन सांगितलं होतं. त्यांनी असं भाषण केलं, शरद पवारांच बोट धरून मी राजकारणात आलो, मला आता माझ्या बोटाची काळजी वाटायला लागली आहे. कारण माझ्या बोटाचा गैरफायदा कुणी असा घेत असेल, तर कठीण आहे, अशा शब्दात शरद पवारांनी मोदींवर टीका केली.
हे ही वाचा : भाजप ठरणार बाहुबली! ठाकरे-पवारांना मिळणार 'एवढ्या' जागा
मी केंद्रात मंत्री होतो आणि मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मला इस्त्रायलला जायचं होतं. केंद्र सरकारने मला ती जबाबदारी दिली होती. इस्त्रायल हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे माझा जायचा कार्यक्रम ठरला. मोदींना कळलो की मी इस्त्रायलला चाललो आहे. त्यावेळी त्यांचा मला फोन आला की मला ही यायचं आहे. तुमच्या शिष्टमंडळात माझाही समावेश करा. मी ठीक आहे म्हटलं.
आम्ही इस्त्रायलला गेलो. दोन दिवसात आम्ही शेतीचं निरीक्षण केलं. त्यानंतर मागे मोदी म्हणाले की मी मागे थांबतो. मागे राहुन त्यांनी काय केलं? याची चौकशी मी केली असता मोदींनी लष्करशाहीची शक्ती कशी आहे. त्याची माहिती घ्यायला मोदी थांबले होते. आम्ही शेती बघायला गेलो होतो. यांनी ही पण माहिती मिळवली. कारण लोकशाहीवर त्यांचा विश्वास नाही, असंही शरद पवार म्हणाले.