Shiv Sena Candidate : ठाणे शिंदेंकडेच! शिवसेनेकडून म्हस्के, शिंदेंना उमेदवारी

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी.
शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाणे लोकसभा शिवसेना उमेदवार

point

कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी

point

महायुतीतील ठाण्याचा तिढा अखेर सुटला

Naresh Mhaske Thane Lok Sabha Candidate : महायुतीच्या जागावाटपाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. मुंबईतील तीन जागा कायम राखल्यानंतर शिंदेंनी ठाणे आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. ठाण्याच्या जागेसाठी भाजप प्रचंड आग्रही होती. संजीव नाईक यांनी प्रचारही सुरू केला होता. त्यामुळे ठाण्यात शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता होती. अखेर ठाण्यातून शिवसेनेचाच उमेदवार लढणार हे स्पष्ट झाले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे श्रीकांत शिंदे हेच लढणार आहेत. (Shiv Sena has nominated Naresh Mhaske from Thane Lok Sabha constituency, while Srikant Shinde will be the candidate from Kalyan)

ADVERTISEMENT

महायुतीमध्ये निर्माण झालेला जागावाटपांचा घोळ अखेर सुटू लागला आहे. मुंबईतील दोन जागांवरील उमदेवार जाहीर केल्यानंतर आता ठाणे आणि कल्याणमधील लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा >> मोदी म्हणाले 'भटकती आत्मा...' ठाकरे म्हणतात 'एक वखवखलेला आत्मा...'  

Thane Lok Sabha : शिवसेना-भाजपमध्ये होती चढाओढ

ठाणे लोकसभा मतदारसंघ परत घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. या मतदारसंघात भाजपतील इच्छुक उमेदवारही आधीच कामाला लागले होते. त्यामुळे ही जागा शिंदेंना मिळणार की भाजप स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी होईल, याबद्दल उत्सुकता होती. पण, जागावाटपात शिंदेंनी बाजी मारली असून, मुंबईतील तीन जागा मिळवण्याबरोबरच ठाणेही स्वतःकडे ठेवण्यात त्यांना यश आले आहे.

हे वाचलं का?

फडणवीसांनी केली होती श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा, पण...

काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली होती. पण, त्यावर बोलताना श्रीकांत शिंदेंनी पक्षाने नाव जाहीर केलेलं नाही, असं म्हटलं होतं.

हेही वाचा >> महायुतीच्या जागा घटणार? मोदींनी मविआचे वाढवले टेन्शन

ते म्हणाले होते की, "फडणवीस यांनी माझ्या उमेदवारीची घोषणी केली, त्याचं मी स्वागत करतो. पण, त्यांनी घोषणा केली असली, तरी माझ्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतरीत्या घोषणा केलेली नाही. आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा पक्ष एका व्यक्तिपुरता मर्यादित नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाईल."

ADVERTISEMENT

ठाणे लोकसभा मतदारसंघातील स्थिती

ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेचे कायम या जिल्ह्यात वर्चस्व राहिलेले आहे. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यात कुणाची ताकद किती, हे याचा अंदाज लावणे कठीण बनले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाने यात स्पष्ट येईल. 

ADVERTISEMENT

ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन आहेत, त्यांचा भाजपला पाठिंबा आहे. कोपरी पाचपाखडीतून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार आहेत. 

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक आहेत, जे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहे. ठाण्यात भाजपचे संजय केळकर हे आमदार आहेत. तर भाजपचे गणेश नाईक हे ऐरोलीचे आमदार आहेत. इकडे बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्याच मंदा म्हात्रे आमदार आहेत. या मतदारसंघातील सहाही आमदार हे महायुतीचे आहेत.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT