Akola Lok Sabha : काँग्रेसचा आंबेडकरांविरोधात उमेदवार ठरला! कोण आहेत पाटील?
Congress Candidate Abhay Patil : अकोला लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आला. काँग्रेसने येथून अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४
प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार
Akola Lok Sabha Election 2024, Prakash Ambedkar vs abhay patil : (धनंजय साबळे, अकोला) अकोला लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून डॉ. अभय पाटील यांचे नाव घोषित करण्यात आले. त्यामुळे आता इथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पण, काँग्रेसने उमेदवारी दिलेले डॉ. अभय पाटील कोण आहेत?
ADVERTISEMENT
अकोला मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि महायुतीकडून म्हणजेच भाजपकडून अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली गेली आहे. ते माजी केंद्रीय मंत्री तसेच विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र आहेत. आता काँग्रेसने अभय पाटील यांना उमेदवारी दिल्याने, निवडणूक रंगतदार होणार आहे.
हेही वाचा >> शिंदेंच्या खासदाराची उडाली झोप, रात्रीच गाठली मुंबई
डॉ. अभय पाटील यांची माहिती
पूर्ण नाव - डॉ. अभय काशिनाथ पाटील
हे वाचलं का?
शिक्षण - एमबीबीएस ऑर्थोपेडीक सर्जन (M.B.B.S. Orthopedic Surgeon)
काँग्रेसमध्ये पद - अकोलाचे जिल्हाध्यक्ष, तर महाराष्ट्र काँग्रेस समितीचे महासचिव
ADVERTISEMENT
जन्म तारीख - 20 जानेवारी 1965
ADVERTISEMENT
व्यवसाय - गेल्या 30 वर्षांपासून अकोल्यात अर्थोपेडीक सर्जन म्हणून प्रॅक्टिस करत आहे. विघ्नहर्ता क्रिटीकल केअरचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. आयकॉन हॉस्पिटलचे व्यवस्थापकी संचालक आहेत.
हेही वाचा >> ठाकरेंना चीतपट करण्यासाठी अजितदादांच्या मनात वेगळाच डाव
सामाजिक उपक्रम आणि कारकिर्द - आतापर्यंत 50 हजार शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. लायन्स क्लॅबचे माजी अध्यक्ष. अकोला आणि वाशिममध्ये मराठा क्रांती मोर्चा संयोजन. संस्थापक अध्यक्ष सालासर बालाजी मंदिर व गणेश चॅरिटेबल ट्रस्ट. अकोला वेद आणि संस्कार स्कूलचे संस्थापक सदस्य. बाळापूर व सोनखास येथे ग्रामीण भागात शाळांची स्थापना केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT