अमिताभ बच्चन यांचा ‘ती’ जाहिरात करण्यास नकार; घेतलेले पैसेही करणार परत
ज्या जाहिरातीमुळे गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ट्रोल होत आहेत, अखेर त्यांनी जाहिरात सोडली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही माहिती समोर आली. कमला पान मसालाच्या जाहिरातीतून बिग बींनी माघार घेतली असून, जाहिरातीसाठी घेतलेली आगावू पैसेही ते परत करणार आहेत. अमिताभ बच्चन कमला पान मसालाच्या जाहिरातीमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. पान मसाल्याची जाहिरात […]
ADVERTISEMENT

ज्या जाहिरातीमुळे गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ट्रोल होत आहेत, अखेर त्यांनी जाहिरात सोडली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही माहिती समोर आली. कमला पान मसालाच्या जाहिरातीतून बिग बींनी माघार घेतली असून, जाहिरातीसाठी घेतलेली आगावू पैसेही ते परत करणार आहेत.
अमिताभ बच्चन कमला पान मसालाच्या जाहिरातीमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. पान मसाल्याची जाहिरात करत असल्याच्या मुद्द्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तर काहींनी आक्षेप घेत टीकाही केली. मात्र, त्यावेळी बच्चन यांनी व्यावसायिक कारण दिलं होतं.
पान मसालाच्या जाहिरातीमुळे लोक सातत्याने टीका आणि ट्रोल करत असतानाच आता अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीतून माघार घेतली आहे. अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीतून आपलं नाव मागे घेतलं आहे. त्याचबरोबर कंपनीने जाहिरातीसाठी दिलेली आगावू रक्कमही बिग बी कंपनीला परत करणार आहेत.
सर्वसामान्य लोकांबरोबरच राष्ट्रीय तंबाखू विरोधी संघटनेनंही अमिताभ बच्चन यांना पान मसाल्याची जाहिरात न करण्याचं आवाहन केलं होतं. नव्या पिढीला पान मसाला सेवनासाठी प्रोत्साहन मिळू नये म्हणून जाहिरातीतून माघार घेत असल्याचं बिग बींनी म्हटलं आहे.