Asur 2 First Look: मोठ्या प्रतिक्षेनंतर ‘असूर’ येतोय… ट्रेलर बघून भरेल धडकी
‘असुर 2’ आता जिओ सिनेमावर पाहता येणार आहे. हा शो 1 जूनपासून या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.
ADVERTISEMENT

Asur 2 First Look : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर तो क्षण आला आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ‘असुर’ या लोकप्रिय हिंदी वेब सीरिजच्या दुसऱ्या भागाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. शोच्या निर्मात्यांनी सीरिजचा फर्स्ट लुकही प्रदर्शित केला आहे. ‘असुर’चा फर्स्ट लूक पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. (Asur 2 web series is going to be streamed on this OTT platform from June 1.)
‘असुर’चा फर्स्ट लूकमध्ये काय?
अर्शद वारसी आणि बरुण सोबती स्टारर वेब सिरीज ‘असुर’ वर्ष 2020 मध्ये रिलीज झाली होती. सुरुवातीपासूनच त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. वेब सीरिजच्या कथेचं आणि सर्व कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. इतकंच नाही तर नंतर तिला सर्वोत्कृष्ट हिंदी मालिकांपैकी एक म्हणूनही ओळखलं गेलं.
तेव्हापासून चाहते असूरच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट बघत आहेत. ‘असुर’चा पुढचा भाग आणण्याची मागणी सोशल मीडियावरून लोक करत होते.
हेही वाचा >> Maharashtra Politics : बच्चू कडूंचं जे झालं, तेच आता रवी राणांचंही होणार?
‘असुर’मध्ये विज्ञान, धर्म आणि गुन्हेगारी यांच्यात अडकलेली अशी वेधक कथा दाखवण्यात आली होती. या वेब सीरिजने अनेकांची झोपच उडवली. या सस्पेन्स थ्रिलर मालिकेत गुन्ह्यांसोबतच धर्म आणि पौराणिक कथा यांच्या मिश्रणाने प्रेक्षकांना वेड लावले.