Mirzapur 3 : 'त्या' हॉट सीनवर काय बरंच काही बोलली सलोनी भाभी!
Mirzapur Season 3 : अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मिर्झापूर सीझन 3 ला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण ज्या पात्राची सर्वाधिक चर्चा झाली ते पात्र म्हणजे सलोनी भाभी...
ADVERTISEMENT

Mirzapur Season 3 : अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मिर्झापूर सीझन 3 ला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. पण ज्या पात्राची सर्वाधिक चर्चा झाली ते पात्र म्हणजे सलोनी भाभी... ही भूमिका अभिनेत्री नेहा सरगमने साकारली आहे. तिने या सीरिजमध्ये दत्ता त्यागीच्या मोठ्या सूनेची भूमिका साकारली आहे. यामध्ये नेहा आणि विजय वर्मा यांच्यात एक इंटीमेट सीनही आहे. हा सीन या सीझनमधील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतोय. लोकांकडून या सीनला प्रचंड पसंती मिळत आहे. अभिनेत्री नेहा सरगम हिने आता यावर स्वत:हून भाष्य केले आहे. (actress neha sargam speaks on her intimate scene in mirzapur season 3)
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नेहाने सांगितले की, सलोनी भाभीच्या भूमिकेसाठी तिला लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे. अनेकजण तिच्या प्रेमात पडले आहेत. पण इंटिमेट सीन देण्यापूर्वी ती खूप घाबरली होती.
हेही वाचा : Uddhav Thackeray : मराठ्यांना 'ओबीसी'तून आरक्षण द्यावं का? ठाकरे म्हणाले, "मोदींनी निर्णय..."
नेहा म्हणते, 'मिर्झापूरचा फॅंडम खूप वेगळा आहे. या सीरिझची क्रेझ काही वेगळीच आहे. लोक मीम्स तयार करत आहेत की, सलोनी भाभीसारखी बायको मिळवण्यासाठी सोमवारचे किती उपवास करावे लागतील? '
पुढे नेहा म्हणाली, 'हा इंटीमेट सीन दिल्यानंतर लोक मला स्वीकारतील याची अपेक्षा नव्हती. लोक काय विचार करतील याबद्दल मी खूपच घाबरले होते. एवढं की, मी दिग्दर्शकालाही सांगितलं होतं की मी हे करू शकणार नाही. हा सीन इंटीमेट असला तरी मिर्झापूरच्या इतिहासातला एक सॉफ्ट इंटीमेट सीन आहे. मला वाटलं होतं की, यानंतर खूप नकारात्मक प्रतिक्रिया येतील, लोक मला खूप ट्रोल करतील. पण, सर्व याउलट झाले.'










