Anant Radhika Wedding : प्री वेडिंगसाठी जंगल थीम, कधी कसं होणार सेलिब्रेशन?
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचं लग्न सध्या जोरदार चर्चेत आहे. 1 ते 3 मार्च या कालावधीत त्यांचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन असणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्ना आधीचे सर्व फंक्शन गुजरातमधील जामनगरमध्ये होणार आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अनंत-राधिका यांच्या जुळणार रेशीमगाठी!
जंगल थीमवर होणार जंगी सेलिब्रेशन
ग्लोबल स्टार पार्टीची वाढवणार शान
Anant Ambani-Radhika Merchant : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचं लग्न सध्या जोरदार चर्चेत आहे. 1 ते 3 मार्च या कालावधीत त्यांचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन (Pre-Wedding Celebration) असणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्ना आधीचे सर्व फंक्शन गुजरातमधील (Gujrat) जामनगरमध्ये (Jamnagar) होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये आंतरराष्ट्रीय स्टार्सही सहभागी होताना दिसतील. (Anant ambani Radhika Merchant Wedding Update Jungle theme for pre wedding how will the celebration be)
ADVERTISEMENT
अनंत-राधिका यांच्या जुळणार रेशीमगाठी!
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे कार्ड समोर आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये काय असेल, तिथला ड्रेसकोड कसा असेल? या सर्वांबाबत अपडेट शेअर केले आहेत. 1 मार्च रोजी 'अॅन ईव्हनिंग इन एव्हरलँड' असा कार्यक्रम असणार आहे. यावेळी एलीगेन्ट कॉकटेल असा ड्रेस कोड असेल. या जादुई जगात संगीत, नृत्य, व्हिज्युअल आर्टिस्ट्री, स्पेशल सरप्राइझेसने अतिथींचे मनोरंजन आणि स्वागत केले जाईल.
जंगल थीमवर होणार जंगी सेलिब्रेशन
2 मार्च रोजी वाइल्ड लाइफ आहे. या दिवसाची थीम 'अ वॉक ऑन द वाइल्डसाइड' अशी आहे. यावेळी पाहुण्यांना वंतारा रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये एक अनोखा अनुभव घेता येईल. या दिवशी कार्यक्रम सकाळी 11.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालेल. जंगल फिव्हर असा या दिवसाचा ड्रेस कोड असेल.
हे वाचलं का?
3 मार्च रोजी मेळावा असणार आहे. या दिवशी गाणी आणि डान्सने पाहुण्यांचे मनोरंजन केले जाईल. हा कार्यक्रम संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सुंदर कार्निव्हलसाठी पाहुण्यांचा ड्रेस कोड डॅझलिंग देसी रोमान्स असा ठेवण्यात आला आहे. पाहुण्यांना डान्सिंग शूज घालण्यास सांगितले आहे जेणेकरून ते पार्टीमध्ये डान्स करू शकतील.
यावेळी निसर्गाच्या सानिध्यात दुपारच्या जेवणाचे आयोजनही करण्यात आले आहे. याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 अशी ठेवण्यात आली आहे. त्याचा ड्रेस कोड कॅज्युअल शीक आहे. त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता राधाकृष्ण मंदिरात हस्ताक्षर इव्हेंट आहे. येथे प्रेम सेलिब्रेट केलं जाईल. या कार्यक्रमाचा ड्रेस कोड हेरिटेज इंडियन आहे.
ADVERTISEMENT
ग्लोबल स्टार पार्टीची वाढवणार शान
पॉप स्टार रिहाना, दिलजीत दोसांझ प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये परफॉर्म करणार आहेत. बिल गेट्स, इवांका ट्रम्प यांसारखे जागतिक चेहरे देखील अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीचा भाग असतील. संपूर्ण जामनगर 1 ते ३ मार्च या कालावधीत उत्सवात रंगलेले दिसेल. अनंत-राधिकाचे लग्न 2024 मधील सर्वात मोठा कार्यक्रम असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT