Mirzapur season 3: कालीन भैय्याचा गुड्डू पंडित घेणार बदला, 'मिर्झापूर 3'ची रिलीज डेट आली समोर
Amazon Prime Mirzapur season 3 release date : भारतातील सर्वात लोकप्रिय वेब सिरीजबद्दल बोलायचं झालं तर, अनेकांच्या तोंडी मिर्झापूरचे नाव येते. अशावेळी चाहत्यांसाठी आता एक गुड न्यूज आहे. मिर्झापूर सीझन 3 च्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'मिर्झापूर सीझन 3' कोणत्या तारखेला होणार प्रदर्शित?

'मिर्झापूर सीझन 3' च्या टीझरने उडाली खळबळ
Mirzapur season 3 release date : भारतातील सर्वात लोकप्रिय वेब सिरीजबद्दल बोलायचं झालं तर, अनेकांच्या तोंडी मिर्झापूरचे नाव येते. या सिरीजचे आतापर्यंत दोन सीझन प्रदर्शित झाले असून दोन्ही हिट झाले आहेत. बहुप्रतिक्षित वेब सिरीजपैकी एक असलेल्या मिर्झापूर सीझन 3 च्या प्रदर्शनाची प्रत्येकजण वाट पाहत आहे. अशावेळी चाहत्यांसाठी आता एक गुड न्यूज आहे. मिर्झापूर सीझन 3 च्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. (the wait of mirzapur season 3 is now over It will be released on 5 July on amazon prime)
सीझन 2 मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कालिन भैय्याला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता या उत्सुकतेला आणखी वाढवण्याचे काम निर्मात्यांनी केले आहे. 'मिर्झापूर सीझन 3' ची रिलीज डेट जाहीर केली आहे. चाहत्यांनी तर आतापासूनच काउंटडाउन सुरू केले आहे.
हेही वाचा: भाजप अध्यक्षपदासाठी मराठी माणसांचं नाव स्पर्धेत, नागपुरात होणार निर्णय?
'मिर्झापूर सीझन 3' कोणत्या तारखेला होणार प्रदर्शित?
पंकज त्रिपाठी आणि अली फजल स्टारर सिरीज 'मिर्झापूर' त्याच्या धमाकेदार ॲक्शन, ड्रामा आणि थ्रीलरसाठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. आता हा तिसरा सीझन 5 जुलै रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. त्याचे एकूण 10 एपिसोड्स असतील. या सिरीजमध्ये कालीन भैयासोबत गुड्डू भैय्या, गोलू गुप्ता, बीना त्रिपाठी आणि सत्यानंद त्रिपाठी पुन्हा एकदा कमबॅक करत आहेत. याशिवाय नवीन पात्रही पाहायला मिळतील.
हेही वाचा: Baramati : 'अजित पवारांविरुद्ध युगेंद्र पवारांना तिकीट द्या', शरद पवारांकडे मागणी
मिर्झापूर सीझन 3 चे नवीन पोस्टर देखील समोर आले आहे. या पोस्टरमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, अंजुम शर्मा, विजय वर्मा आणि ईशा तलवार दिसत आहेत. गोलू गुप्ताचा (श्वेता त्रिपाठी) लुकही पूर्णपणे बदललेला दिसत आहे. या सिरीजमध्ये नवा ट्वीस्ट पाहायला मिळेल हे या पोस्टरवरून स्पष्ट होत आहे.