Baramati : 'अजित पवारांविरुद्ध युगेंद्र पवारांना तिकीट द्या', शरद पवारांकडे मागणी
Baramati Assembly eleciton 2024 : बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची शरद पवारांकडे मागणी
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बारामती विधानसभा मतदारसंघ निवडणूक

युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी

अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढत होण्याची शक्यता
Baramati Assembly election : (वसंत मोरे, बारामती) 'आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे. युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर करा', अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) कार्यकर्त्यांनी थेट शरद पवारांकडे केली. बारामतीतील कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची त्यांच्या गोविंद बाग येथील घरी भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी उमेदवारी जाहीर करण्याचा हट्ट धरला.
लोकसभा निवडणुकीमुळे बारामतीची चर्चा देशभरात झाली. पहिल्यांदाच शरद पवार विरुद्ध अजित पवार असा राजकीय संघर्ष बारामतीमध्ये बघायला मिळाला. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी दिली. पण, सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. लाखाहून अधिक मताधिक्य घेत सुप्रिया सुळे विजयी झाल्या.
अजित पवारांना धक्का
बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांना मोठं मताधिक्य मिळालं आहे. अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातूनही सुप्रिया सुळे यांना ४७ हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळालेले आहे. हा निकाल अजित पवारांसाठी धक्कादायक ठरला.
विधानसभेला पवार विरुद्ध पवार लढत होणार?
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात झोकून घेतले. युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर ते विधानसभेची निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चाही सुरू झाली होती. पण, त्यावर युगेंद्र पवारांनी उत्तर देणं टाळलं.