खोटेपणाची अ’जीत’ कहाणी आता देवीसिंग मांडणार कोर्टापुढे

मुंबई तक

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका ‘देवमाणूस’वर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका ‘देवमाणूस’वर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. यात मध्यवर्ती भूमिकेत ‘किरण गायकवाड’ याने आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिकली आहेत. या मालिकेत आलेल्या विलक्षण वळणाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.

भर लग्नमंडपातून अजितला अटक झाल्यानंतर त्याची झालेली नाचक्की आणि अपमान डॉक्टर सहन करू शकत नाहीये, या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समीकरण शिजू लागलेयत ह्यासाठी तो डिम्पलची मदत घेतोय. इकडे सगळं गाव डॉ. अजितच्या मागे उभं आहे कारण तो गावासाठी देवमाणूस आहे. पण ए.सी.पी. दिव्या सुद्धा आपल्या निर्णयावर ठाम आहे तिने अजित विरुद्धचे सगळे पुरावे गोळा केलेत आणि ते मी कोर्टातच सगळ्या जगासमोर आणेन आणि ह्या देवमाणसामागे लपलेला खरा चेहेरा बाहेर आणेन असं ती ठामपणे सांगते.

हे वाचलं का?

    follow whatsapp