Kangana Ranaut: "बॉलिवूड स्टार किड्स हे उकडलेल्या अंड्यांसारखे दिसतात"

जाणून घ्या आणखी कंगना रणौतने काय काय म्हटलं आहे?
Kangana Ranaut: "बॉलिवूड स्टार किड्स हे उकडलेल्या अंड्यांसारखे दिसतात"
Kangana Ranaut's movie 'Dhaakad' to release in Hindi, Tamil, Telugu and Malayalamफोटो-इंडिया टुडे

बॉलिवूडमधल्या घराणेशाहीच्या विरोधात अभिनेत्री कंगना रणौत कायमच आक्रमक झालेली पाहण्यास मिळते. आता पुन्हा एकदा तिचं एक वक्तव्य चर्चेत आहे. बॉलिवूडमधल्या स्टार किड्सवर म्हणजेच हिरो-हिरोईन्सच्या मुलांवर तिने टीका केली आहे. बॉलिवूड स्टार किड्समुळे बाहेरून आलेल्या कलाकारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो असं तिने म्हटलं आहे. एवढंच नाही तर या स्टार किड्सची तुलना तिने उकडलेल्या अंड्यांशी केली आहे.

Kangana Ranaut's movie 'Dhaakad' to release in Hindi, Tamil, Telugu and Malayalam
थलायवीचे कौतुक न केल्याबद्दल कंगना राणौतने बॉलिवूडवर चढवला हल्ला, म्हणाली...

काय म्हणाली कंगना?

"साऊथमधल्या म्हणजेच दाक्षिणात्य अभिनेत्यांसोबत प्रेक्षक लवकर कनेक्ट होतात. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ते कलाकार त्यांच्या चाहत्यांसोबत कनेक्शन निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. बॉलिवूडमधे तसं नाही. बॉलिवूडमधले स्टार किड्स शिक्षण घ्यायला विदेशात जातात. तिथे इंग्रजीत बोलतात. हॉलिवूडचे चित्रपट पाहतात. असे किड्स जर सिनेमात आले तर प्रेक्षक त्यांच्याशी कनेक्ट कसे होतील? त्यांचा लुक वेगळा असतो. एखाद्या उकडेल्या अंड्यासारखे ते दिसतात. त्यामुळे प्रेक्षक त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकत नाहीत. मला त्यांना ट्रोल करायचं नाही." असंही कंगनाने म्हटलं आहे.

अभिनेत्री कंगना
अभिनेत्री कंगना फोटो- फेसबुक पेज-कंगना

मात्र स्टार किड्सबाबत तिने केलेलं हे वक्तव्य कदाचित नव्या वादाला तोंड फोडणारं असू शकतं. कंगनाचा धाकड हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. कंगनाचा अगदी हटके लुक यामध्ये दिसतो आहे. कारण काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर आला आहे. आता कंगनाने सिनेमा यायच्या आधी एबीपीच्या एका कार्यक्रमात स्टार किड्सवर भाष्य केलं आहे.

धाकड सिनेमाचं शुटिंग
धाकड सिनेमाचं शुटिंग फोटो सौजन्य- फेसबुक पेज-कंगना रणौत

कंगनाकडून पुष्पा सिनेमाचं कौतुक

पुष्पा द राइज या सिनेमातील अल्लू अर्जुनच्या भूमिकेचं कंगनाने कौतुक केलं आहे. ती म्हणाली की बॉलिवूडमधला कोणताही अभिनेता अल्लू अर्जुनसारखं काम करू सकणार नाही. अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. २०२१ मध्ये कंगनाचा थलायवी हा सिनेमा आला होता. या सिनेमात तिने तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारली होती. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती लाभली. आता तिचा धाकड हा सिनेमा भेटीला येतो आहे.

धाकड हा कंगनाचा सिनेमा हिंदी, तेलुगु आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा २७ मे रोजी येणार होता. मात्र तूर्तास या सिनेमाची प्रदर्शनाची ताऱीख बदलण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in