Aarya Jadhao : ''...तर बिग बॉसमध्ये पुन्हा परतणार'', Insta लाईव्हवर आर्याने निक्कीला भिडण्याचे दिले संकेत
Aarya Jadhao News : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये एकापेक्षा एक राडे पाहायला मिळतायत. गेल्याच आठवड्यात आर्या जाधवने निक्कीला कानशिलात लगावली होती. यामुळे घरात मोठा राडा झाला होता. या प्रकरणी बिग बॉसने शिक्षा म्हणून आर्याला घराबाहेर देखील काढलं होतं. यावेळी आर्या घराबाहेर पडली नसेल हा बिग बॉसचा ट्विस्ट असेल, असा फॅन्सचा अंदाज होता. मात्र आज आर्या इस्टाग्रामवर लाइव्ह आल्यानंतर ती घराबाहेर पडल्याच्या घटनेला पुष्टी मिळाली आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बिग बॉसमधल्या राड्यावर आर्याचं इंस्टाग्राम लाईव्ह
आर्याने सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले
आर्याने यावेळी बिग बॉसमध्ये घडलेल्या घटनेवर सविस्तर भुमिका मांडली.
Aarya Jadhao, Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये एकापेक्षा एक राडे पाहायला मिळतायत. गेल्याच आठवड्यात आर्या जाधवने (Aarya Jadhao) निक्कीला (Nikki Tamboli) कानशिलात लगावली होती. यामुळे घरात मोठा राडा झाला होता. या प्रकरणी बिग बॉसने शिक्षा म्हणून आर्याला घराबाहेर देखील काढलं होतं. यावेळी आर्या घराबाहेर पडली नसेल हा बिग बॉसचा ट्विस्ट असेल, असा फॅन्सचा अंदाज होता. मात्र आज आर्या इस्टाग्रामवर लाइव्ह आल्यानंतर ती घराबाहेर पडल्याच्या घटनेला पुष्टी मिळाली आहेत.तसेच या लाईव्ह दरम्यान आर्याने घरात पुन्हा एन्ट्री घेणार असल्याचे संकेत दिले होते. (bigg boss marathi aarya jadhao instagram live speak about nikki tamboli slap case bigg boss marathi seasaon 5)
बिग बॉसमध्ये झालेल्या राड्यानंतर आज आर्याने इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन फॅन्सशी संवाद साधला. यावेळी आर्याने सर्वात प्रथम तिला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले होते.तसेच असाच कायम सपोर्ट करण्याची विनंती केली होती. या लाईव्ह दरम्यान बिग बॉसमध्ये घडलेल्या घटनेवर सविस्तर आपली भुमिकाही मांडली.
हे ही वाचा : Bigg Boss Marathi : अरबाजला वाचवायला गेला अन् स्वत:चाच दिला बळी, वैभव चव्हाण घराबाहेर!
बिग बॉसमध्ये आर्याने मला कानशिलात लगावल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बिग बॉसने शिक्षा म्हणून आर्याला घराबाहेर काढले होते. त्यानंतर आता घराबाहेर आल्यानंतर आता आर्याने निक्कीवर गंभीर आरोप केला आहे.निक्कीने मला कानशिलात लगावल्याचा आरोप आर्याने केला आहे. यावेळी आर्याने निक्कीची स्टेटेजी देखील सांगितली. निक्कीचं कसं आहे ती आधी धक्काबुक्की करते आणि या दरम्यानच ती कानाखाली खेचते, त्यामुळे समोरचा गोंधळतो आणि धक्काबुकीत त्याला ही गोष्ट झाल्याचे समजते. त्यामुळे कुणी बोलत नाही, असे आर्या म्हणते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आर्या पुढे म्हणाली, मला पहिल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्कीची नखं लागली होती. याआधी सुद्धा तिने बऱ्याच वेळा नखं मारण, ओढणं, धक्काबुक्की करणं असे प्रकार केले आहेत. हे सगळं मनात साचून राहतं आणि एकदाच बाहेर येतं. तिची आई म्हणाली, माझी मुलगी तिथे मार खायला गेलीये का? नाही काकू आम्ही पण, तिथे मार खायला नव्हतो गेलो. निक्की समोरच्यावर खूप विचार करून हात उचलते…आणि ते कोणाला कळत सुद्धा नाही. धक्काबुक्कीमध्ये तिने आधी मला मारलं…त्यानंतर माझी लगेच प्रतिक्रिया निघाली, असे आर्याने म्हटले.
तसेच मी हात उचलणे ही कृती योग्य नव्हती. ती एकप्रकारची हिंसा आहे. पण तुला तुझ्या शब्दात उत्तर द्यायचं होतं असं आर्याने यावेळी म्हटलं आहे. मला बिग बॉस ट्रॉफी जिंकण्याची इच्छा नाही, चाहते माझी ट्रॉफी आहेत, असे आर्याने म्हटलं आहे. आर्याने लाईव्ह दरम्यान अनेक चाहत्यांच्या प्रश्नांना देखील उत्तर दिली. एका चाहत्याने तिला विचारले की, बिग बॉस स्क्रिप्टेड आहे का? यावर तिने नाही असे उत्तर दिले आहे. दुसऱ्या एका चाहत्याने बिग बॉसमध्ये पुन्हा जाणार का? असा सवाल केला होता? यावर आर्याने नक्कीच पुन्हा बिग बॉसमध्ये जाईन, असे म्हटले आहे. त्यामुळे जर आर्याला पुन्हा संधी मिळाली तर तिचा निक्कीसोबत राडा होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Big Boss Marathi 5: '... जसं दिसतं तसं नसतं'; आर्याच्या 'त्या' स्टोरीतून नेमके कोणते संकेत?
ADVERTISEMENT