Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात रांगडा गडी येणार! अरबाज, वैभवला देणार टक्कर?
Bigg Boss Marathi First Wild Card Entry : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.या सीझनमध्ये घरात A आणि B असे दोन ग्रुप पडले आहेत. अशात आता पहिल्या आठवड्यापासूनच बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi) घरात कोण वाईल्ड कार्ड (Wild Card) सदस्य सहभागी होणार याकडे बिग बॉसप्रेमींचं लक्ष लागलं होतं
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बिग बॉस मराठीत होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री
अरबाज, वैभवला टफ फाईट देणार
कोण असणार तो वाईल्ड कार्ड सदस्य?
Bigg Boss Marathi First Wild Card Entry : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.या सीझनमध्ये घरात A आणि B असे दोन ग्रुप पडले आहेत. अशात आता पहिल्या आठवड्यापासूनच बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi) घरात कोण वाईल्ड कार्ड (Wild Card) सदस्य सहभागी होणार याकडे बिग बॉसप्रेमींचं लक्ष लागलं होतं. आता ती वेळ आलेली आहे. कारण आज बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. या संदर्भातला प्रोमो बिग बॉसने शेअर केला आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणारा तो सदस्य कोण आहे? याची उत्सुकता बिगबॉस प्रेमींना लागली आहे. (bigg boss marathi season 5 first wild card entry in house sangram chougule body builder)
बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री होणार आहे. 'बिग बॉस मराठी'चा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये, ''तो आहे मर्द रांगडा आणि मनाचा राजा...अस्सल फौलाद घालणार 'बिग बॉस'च्या घरात राडा'', असं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे अरबाज, वैभवला टक्कर देणाऱ्या सदस्यांची घरात एन्ट्री होणार असल्याची चर्चा आता रंगली आहे.
हे ही वाचा : Numerology: गणपती बाप्पाचा आवडता अंक! तुमचंही 'या' नंबरशी असू शकतं खास कनेक्शन
वाइल्ड कार्ड एन्ट्रीचा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी कोल्हापुरचा संग्राम चौगुले घरात येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘संग्राम भाऊ पण निक्कीचा नादी लागू नको म्हणजे झालं’. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘आता अरबाजला आसमान दाखवायला थोडाच वेळा बाकी…होऊ द्या खर्च.’ तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘आता संग्राम चौगुले वाट लावणार.’.त्यामुळे तो सदस्य सग्रामच आहे का? हे आज स्पष्ट होणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
छोटा पुढारी घराबाहेर
दरम्यान, शनिवारी बिग बॉस मराठीच्या घरातून घनःश्याम दरवडे एलिमिनेट झाला. यावेळी अरबाजसह काही स्पर्धक भावुक झालेले पाहायला मिळाले. महत्त्वाचं म्हणजे एखादा स्पर्धक घराबाहेर झाला तर तो म्युच्युअल फंडच्या कॉइनचा वारसदार म्हणून घरातील स्पर्धकांपैकी एकाला निवडतो. घनःश्यामने म्युच्युअल फंडच्या कॉइन वारसदार म्हणून अरबाज किंवा निक्कीला नव्हे तर सूरज चव्हाणला निवडला. घनःश्यामचा हा निर्णय ऐकून सगळ्यांच धक्का बसला आहे.
हे ही वाचा : Mahesh Landage: भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी, यामागचं कारण काय?
अरबाज, निक्कीला रितेशने झापलं
भाऊच्या धक्क्यावर शनिवारी रितेशने सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. अरबाज पटेल, निक्की तांबोळी यांना रितेशने खूप झापलं. एवढंच नव्हेतर आठवड्याभरातील निक्कीच्या वर्तणुकीवरून आणि नियमभंग केल्यामुळे तिला दोन मोठ्या शिक्षा दिल्या. संपूर्ण पर्व निक्की कॅप्टन होऊ शकणार नाही. तसंच येत्या आठवड्यात तिला घरातील सर्व सदस्यांची भांडी घासावी लागणार आहेत. जर या शिक्षेचं पालन केलं नाहीतर निक्कीला थेट नॉमिनेट केलं जाणार आहे. त्यामुळे निक्की आता शिक्षेचं पालन कशाप्रकारे करतेय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT