Suraj Chavan: मंदिरातले नैवेद्य खाऊन काढले दिवस अन् बिग बॉस जिंकताच नशीब उजाडलं, केदार शिंदेंची मोठी घोषणा!
Bigg Boss Marathi Season 5 Winner : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी प्रसिद्ध रिलस्टार सूरज चव्हाणने झापूक झुपूक करत जिंकली आहे. घरातल्या सगळ्यांच सदस्यांना 'गुलीगत धोका' देऊन सूरज चव्हाणने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनची ट्रॉफी सूरज चव्हाणने जिंकली
सूरजच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण
केदार शिंदेंनी केली कोणती मोठी घोषणा?
Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी प्रसिद्ध रिलस्टार सूरज चव्हाणने झापूक झुपूक करत जिंकली आहे. घरातल्या सगळ्यांच सदस्यांना 'गुलीगत धोका' देऊन सूरज चव्हाणने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. त्यामुळे सूरजच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पण बिग बॉस जिंकत असतानाच प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जी घोषणा केली त्यामुळे सूरजचं आता नशीबच उजाडलं आहे. (suraj chavan winner of bigg boss marathi season 5 kedar shinde big announcement for him know about it)
ADVERTISEMENT
बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यापासूनच सूरजचं वागणं, बोलणं या सगळ्याचीच जोरदार चर्चा होत होती. जरी त्याला गेम समजत नव्हता पण, समजावून सांगितल्यावर तो जीव ओतून जोमाने खेळायचा आणि टास्क जिंकवून दाखवायचा. बिग बॉसमधील एन्ट्रीनंतर सूजर आता संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका झाला आहे. मोठ्या मोठ्यांचंही मन त्याच्या साध्या राहणीमानावर भाळलं.
हेही वाचा : Maharashtra Weather: 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस! 48 तासांत मोठा बदल, पाहा हवामानाचा अंदाज
सूरज चव्हाण विजेता होणार याची चर्चा सोशल मीडियावर आधीच होती. त्याचप्रमाणे घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचंही अनेकदा कौतुक झालं आहे. इतकच नव्हे तर बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याचीही संधी सूरजने मिळवली. त्यामुळे इतर स्पर्धकांपेक्षाही तो वरचढ ठरला.
हे वाचलं का?
केदार शिंदेंनी केली कोणती मोठी घोषणा?
सूरजचा खेळ, प्रामाणिकपणा, वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला. त्याला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा शेवटपर्यंत मिळत गेला. सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यानंतर ट्रॉफीसह 14 लाख रुपयांचा चेक मिळाला आहे. तसेच सूरजला पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आली आहे. तसेच सूरजला एक गाडीदेखील बक्षीस म्हणून मिळाली आहे.
हेही वाचा : Suraj Chavan : 14 लाखांचा चेक, बाईक आणि...बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती लाख मिळाले?
यासोबतच सूरजला आणखी एक मोलाची भेट मिळाली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला आपल्या चित्रपटात संधी देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट ठरणार आहे. सूरजचे चाहते या घोषणेनंतर खूप आनंदी आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT