MC Stanच्या शोमध्ये करणी सेनेचा गोंधळ; शोमधून पळ काढावा लागला
MC Stan’s show Indore : (Bigg Boss) बिग बॉस विजेता आणि रॅपर एमसी स्टॅन चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. एमसी स्टॅनबाबत चाहत्यांची क्रेझ सातव्या गगनाला भिडलेली असते. एमसी स्टॅन बिग बॉसपासून सतत शो करत आहे. त्याची मागणी खूप वाढली आहे. पण आता एमसी स्टॅनबद्दल एक बातमी समोर येत आहे. (Indore) इंदूरमधील रॅपरच्या शोला करणी सेनेने विरोध […]
ADVERTISEMENT

MC Stan’s show Indore : (Bigg Boss) बिग बॉस विजेता आणि रॅपर एमसी स्टॅन चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. एमसी स्टॅनबाबत चाहत्यांची क्रेझ सातव्या गगनाला भिडलेली असते. एमसी स्टॅन बिग बॉसपासून सतत शो करत आहे. त्याची मागणी खूप वाढली आहे. पण आता एमसी स्टॅनबद्दल एक बातमी समोर येत आहे. (Indore) इंदूरमधील रॅपरच्या शोला करणी सेनेने विरोध केला होता, त्यानंतर त्याला कार्यक्रम सोडावा लागला होता.(MC Stan’s show shut down by Karni Sena; The police had to lathicharge)
एमसी स्टॅनच्या शोमध्ये गोंधळ
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या लासुदिया पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये एमसी स्टॅनचा कॉन्सर्ट होणार होता, ज्यामध्ये रॅपरला आधीच सूचना देण्यात आली होती की, जर त्याने कोणताही आक्षेपार्ह शब्द वापरला तर करणी सेना त्याला विरोध करेल. मात्र गायक-रॅपर एमसी स्टेन याला ते मान्य नव्हते आणि त्याने रात्री उशिरा शोमध्ये गाणे म्हणताच करणी सेनेचे लोक मंचावर पोहोचले.
गोंधळामुळे एमसी स्टॅनला शोमधून पळ काढावा लागला. गोंधळ इतका वाढला की पोलिसांना हलका लाठीचार्ज करावा लागला. करणी सेनेने विरोध केल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाला कॉन्सर्ट मागे घ्यावा लागला. शेकडो जनता रस्त्यावर जमली होती, तिथे करणी सेनेकडून सातत्याने निषेध करण्यात येत होता.
Bigg Boss 16 : पुणेकर MC Stan कसा घडला? ‘अस्तगफिरुल्ला’ने दिली कलाटणी