कधी चोर.. कधी वेटरची भूमिका साकरणारा नवाजुद्दीन सिद्दीकी आज घेतो कोट्यवधी रुपये, पण नेहमी अडकतो वादात
नवाजने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. काही चित्रपटांमध्ये तो चोर, तर काहींमध्ये वेटर म्हणून दिसला. त्याने वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. नवाजुद्दीन आज (19 मे) ४९ वर्षांचा झाला आहे. यामुळे आज आपण त्याच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

Nawazuddin Siddiqui Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचं भरभरून मनोरंजन करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सर्वांच्याच आवडीचा. 49 वर्षीय नवाजुद्दीनचा जन्म 19 मे 1974 रोजी उत्तर प्रदेशातील बुढाना या छोट्याशा गावात झाला. सध्या तो त्याच्या आगामी ‘जोगिरा सारा रा रा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एक काळ असा होता की जेव्हा इंटिमेट सीन्सचा विषय यायचा तेव्हा अभिनेत्री त्याच्यासोबत काम करण्यास नकार द्यायच्या. पण आता त्याच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेत्री इच्छुक असतात. नवाजुद्दीन गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग आहे. पण त्याला प्रसिद्धी फार उशिरा मिळाली. (Nawazuddin Siddiqui Birthday started his career with small roles in Movies)
नवाजने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. काही चित्रपटांमध्ये तो चोर, तर काहींमध्ये वेटर म्हणून दिसला. त्याने वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. नवाजुद्दीन आज (19 मे) ४९ वर्षांचा झाला आहे. यामुळे आज आपण त्याच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Sushma Andhare: उद्धव ठाकरेंची भेट झाली असती, तर…; आप्पासाहेब जाधवांचे गंभीर आरोप
छोट्या भूमिका साकारत करिअरला केली सुरूवात, फार उशिरा मिळाली प्रसिद्धी!
नवाजुद्दीन ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘मंटो’ आणि ‘बदलापूर’ यांसारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. आज त्यांच्या नावावर असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. पण एक काळ असा होता जेव्हा त्याने आमिर खान, संजय दत्त आणि अभय देओलसारख्या अभिनेत्यांच्या चित्रपटात काम केले. या स्टार्सच्या चित्रपटांमधील त्याची भूमिका खूपच लहान होती.
नवाजुद्दीन सिद्दीकीने पहिल्यांदा ‘सरफोर्स’ चित्रपटात काम केले होते. आमिर खानच्या या प्रसिद्ध चित्रपटात नवाजुद्दीनने गुन्हेगाराची भूमिका साकारली होती. यात त्याची भूमिका छोटी होती. यानंतर तो ‘शूल’ चित्रपटात वेटरच्या भूमिकेत दिसला होता. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये त्याने मारहाण झालेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती.