Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने शेअर केलेला 'हा' व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल

Shilpa Shetty Video Viral: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आपल्या मुलांचा योग करतानाचा एक व्हीडिओ शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने शेअर केलेला 'हा' व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल
Shilpa Shetty Video Viral

मुंबई: फिटनेस फ्रिक बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही आपल्या आयुष्यात फिटनेसला किती महत्त्व देते हे आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. शिल्पा ही योगा प्रेमी आहे आणि योगा करताना तिचे व्हिडीओ आणि फोटो ती नेहमी आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करते. आता एका नवीन व्हीडिओमध्ये शिल्पा तिच्या दोन्ही मुलांसोबत योगा करताना दिसत आहे.

इंटरनेटवर शिल्पाच्या मुलांचा व्हीडिओ व्हायरल

शिल्पा शेट्टीने तिचा मुलगा वियान आणि मुलगी समीशाचा एक व्हीडिओ तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये शिल्पाची दोन्ही मुले योग करताना दिसत आहेत. शिल्पा शेट्टी स्वतः व्हीडिओमध्ये दिसत नाही, पण तिचा आवाज व्हीडिओमध्ये ऐकू येतो. शिल्पा तिच्या दोन्ही मुलांना योग करायला शिकवत आहे. व्हीडिओमध्ये विआन आपल्या लहान बहिणीला योगासने करायला शिकवताना दिसत आहे.

शिल्पा शेट्टीच्या मुलांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिल्पाच्या दोन्ही मुलांचा समजूतदारपणा आणि एकमेकांबाबत असलेलं बाँडिंग याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. अवघ्या 3 तासात शिल्पाच्या मुलांच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

शिल्पाने मुलांचा व्हीडिओ एका खास कॅप्शनसह शेअर केला आहे. 'मुले ओल्या मातीसारखी असतात. आपण लवकरच त्यांचा दृष्टिकोन निरोगी जीवनशैलीकडे वळवला पाहिजे. यामध्ये संतुलित आहाराचा आनंद घेणे, तंदुरुस्त राहणे आणि मन-आत्म्यावर नियंत्रण ठेवणे या गोष्टींचा समावेश असला पाहिजे. वियानसोबत मी असेच काही तरी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेच आता तो आपली लहान बहीण समिशाला शिकवतोय ते पाहून अभिमान वाटतो.'

Shilpa Shetty Video Viral
राज कुंद्राला जामीन मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टीची पहिली पोस्ट चर्चेत

शिल्पा शेट्टी सध्या डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्स चॅप्टर 4 मध्ये जज म्हणून सहभागी झाली आहे. या शोमध्ये शिल्पा तिच्या चाहत्यांचं बरंच मनोरंजन देखील करत आहे. या शोनंतर शिल्पा एका नवीन टॅलेंट बेस्ट रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे.

शिल्पा शेट्टीच्या पतीला करण्यात आली होती अटक

शिल्पाचा पती राज कुंद्रा हा एक यशस्वी व्यावसायिक मानला जात होता. मात्र काही प्रकरणं अशी घडली की ज्यामुळे त्याची बदनामी झाली. HotShot या App वर अश्लील व्हीडिओज आणि सेक्स कंटेट इतका वाढला होता की ते App आधी Appale Play Store आणि नंतर अँड्रॉईडने रिमूव्ह केलं. HD videos and Short movies असं या अॅपचं डिस्क्रिप्शन देण्यात आलं होतं.

या अॅपवर जगभरातल्या मॉडेल्ससोबत लाईव्ह कम्युनिकेशनही करता येत होतं. या ठिकाणी तयार होणाऱ्या शॉर्ट फिल्म आणि वेब सीरिजमध्ये काम देतो असं आमिष पुरूष आणि स्त्री कलाकारांना दिलं जात होतं आणि त्यांच्याकडून न्यूड किंवा सेमी न्यूड सीन शूट करून घेतले जात होते. हेच सीन या App मध्ये प्रसारितही केले जात होते. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in