सोनम कपूर होणार आई; फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'

Sonam Kapoor is Pregnant : सोनम कपूरने सोशल मीडियावर 'बेबी बंप' फोटो केले शेअर
पती आनंद आहुजासोबत सोनम कपूर/ Sonam Kapoor is Pregnant
पती आनंद आहुजासोबत सोनम कपूर/ Sonam Kapoor is Pregnant Sonam Kapoor/instagram

सोनम कपूरच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. बॉलिवडूमधील मोस्ट स्टायलिश अभिनेत्री असलेल्या सोनम कपूरच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. सोनम कपूर लवकरच आई होणार असून, तिने बेबी बंपचे फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली.

सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर पती आनंद आहुजासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

सोनम कपूरने बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती पती आनंद आहुजासोबत दिसत आहे. सोनम कपूरने तीन फोटो शेअर केले असून, दोन ब्लॅक अॅण्ड व्हाईट तर एक कलर फोटो आहे.

फोटो शेअर करत सोनम कपूरने म्हटलं आहे की, चार हात, तुझं खूप चांगलं संगोपन करण्यासाठी, जे आम्ही करू शकतो. दोन ह्रदय जी ज्यांची स्पंदन तुझ्यासोबत धडकतील, प्रत्येक वेळी. आमचं कुटुंब, जे तुझ्यावर भरभरून प्रेम करेल आणि तुला भक्कम साथ देईल. आम्ही तुझं स्वागत करण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही."

सोनम कपूरने गुड न्यूज दिल्यानंतर सगळे सोनम आणि आनंद आहुजाचं अभिनंदन करत आहेत. वाणी कपूर, करीना कपूर, अंशुला कपूर, खुशी कपूर, जान्हवी कपूर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोनमचं अभिनंदन केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in