‘3 idiots’ मधील लायब्रेरियन दुबे काळाच्या पडद्याआड! मृत्यूचे कारण आले समोर

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Akhil Mishra Passes Away : बॉलिवूड विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील लायब्रेरियनच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते अखिल मिश्रा याचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मीरा रोड येथील घरात बुधवारी (20 सप्टेंबर) दुपारी अचानक पाय घसरल्याने अखिल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना घाईघाईने दवाखान्यात नेऊन दाखल करण्यात आलं. (3 idiots Fame Actor Akhil Mishra Died)

जखम खोल असल्याने डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत आणि काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला. अखिल यांची पत्नी सुझान बर्नेट चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादला गेली होती. सुझैनच्या मॅनेजरने अखिल यांच्या मृत्यूबाबत ही माहिती दिली.

Crime News : विद्यार्थ्याने शिक्षकाचा अश्लील व्हिडिओ इंस्टाग्रामवर केला शेअर

‘3 इडियट्स’मधून मिळाली ओळख!

अखिल मिश्रा यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी भंवर, उत्तरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, भारत एक खोज, रजनी असे शो केले होते. चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्याने डॉन अब्बा, हजारों ख्वाइशे ऐसी, 3 इडियट्स या चित्रपटात काम केलं होतं. अखिल यांनी वर्षानुवर्षे इंडस्ट्रीत काम केले पण त्यांना 3 इडियट्समधील लायब्रेरियन दुबेच्या भूमिकेतून ओळख मिळाली. उत्तरन या मालिकेतील उमेद सिंग बुडेलाच्या भूमिकेतही त्यांना खूप पसंती मिळाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पत्नीसोबत ऑनस्क्रीनही केलं होतं काम

अखिल यांची पत्नी सुझान बर्नेट ही देखील व्यवसायाने अभिनेत्री आहे. पतीच्या निधनानंतर ती दु:खात आहे. अखिलच्या पहिल्या पत्नीचे नाव मंजू मिश्रा होते. 1983 मध्ये लग्न झाल्यानंतर 1997 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मंजूपासून विभक्त झाल्यानंतर सुझैन अखिलच्या आयुष्यात आली. अखिलने 2009 मध्ये सुझान बर्नेटशी लग्न केले. हे त्यांचे दुसरे लग्न होते.

पती-पत्नीने मिळून प्रोजेक्टही केले. कर्मा, टीव्ही शो ‘मेरा दिल दीवाना’, ‘मजनू की ज्युलिएट’ या डॉक्युमेंट्रीतून त्यांनी एकत्र स्टेज शेअर केला. सुझान अनेक भाषांमधील चित्रपट आणि शोमध्ये काम करते. ती कसौटी जिंदगी की, सावधान इंडिया, एक हजारों में मेरी बहना है, चक्रवर्ती अशोक सम्राट, ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकांमध्ये दिसली आहे. सुझानने अनेकदा पडद्यावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भूमिका साकारली आहे.

ADVERTISEMENT

साईनगरी हादरली! शिर्डीत जावयाने सासरच्या तिघांना संपवलं, पहिला वार पत्नीवर

अखिल यांनी एकेकाळी करिअरमधून घेतला होता ब्रेक! कारण..

अखिल अॅक्टिंग कोचही होते. एकेकाळी त्यांनी त्यांची जर्मन पत्नी सुझान बर्नेट हिला शुद्ध हिंदी शिकवण्यासाठी करिअरमधून ब्रेक घेतला होता. याचा खुलासा सुझानने एका मुलाखतीत केला. चक्रवर्ती अशोक सम्राट हा टीव्ही शो करताना तिला समस्या आल्या त्यानंतर तिचा पती म्हणजेच अखिल यांनी आपला सगळा वेळ तिच्यासाठी काढला. करिअरमधून ब्रेक घेत ते रोज सुझानला हिंदी शिकवत असे.

ADVERTISEMENT

नववीच्या विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका, क्षणात होत्याच नव्हतं झालं, डॉक्टर म्हणाले…

अखिल यांच्या अचनाक जाण्याने चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. आज ते या जगात नसले तरी त्यांच्या या अविस्मरणीय कामासाठी ते सदैव स्मरणात राहतील. अभिनेत्याच्या निधनाची बातमी कळताच चाहते दु:खी झाले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT