अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर

मुंबई तक

Actor Dharmendra : अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर

ADVERTISEMENT

Actor Dharmendra Passes Away
Actor Dharmendra Passes Away
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर

Actor Dharmendra, मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आलीये. धर्मेंद्र यांना प्रकृती बिघडल्याने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलंय. 

धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला उपचारांना ते काही प्रमाणात प्रतिसाद देत होते, मात्र पुढे त्यांची तब्येत अधिकच खालावली. परिस्थिती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. रुग्णालय प्रशासनानं सुरुवातीला त्यांची स्थिती स्थिर असल्याचं सांगितलंय. धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, आमिषा पटेल यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांची भेट घेतलीये.

धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘चुपके चुपके’, ‘यादों की बारात’, ‘धरम वीर’, ‘अनुपमा’ यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून त्यांनी चाहत्यांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. बॉलिवूडच्या या महानायकाच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी सामाजिक माध्यमांद्वारे श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे.

अभिनयातील सहा दशकांचा सुवर्णकाळ

धर्मेंद्र यांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द म्हणजे एक सुवर्ण पर्वच मानलं जातं. ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’ यांसारख्या अजरामर चित्रपटांतून त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांचा दमदार व्यक्तिमत्व, सहज अभिनय आणि भावनांनी भरलेली अभिव्यक्ती यामुळे ते आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp