अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा गोव्यात अपघाती मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पुणे शहरात वास्तव्यास असणारी मराठमोळी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिचा २० सप्टेंबर रोजी अपघाती मृत्यू झाला. गोव्यातील बागा- कलंगुट येथे घडलेल्या या अपघातात ईश्वरीचा मित्र शुभम देगडे याचाही मृत्यू झाला आहे. सोमवारी २० सप्टेंबर रोजी पहाटे हा अपघात घडला. गोव्यातील बागा येथीलद रस्त्याने जात असताना शुभमचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खाली असलेल्या खाडीत कोसळली. त्यातच गाडी लॉक झाल्याने दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.पोलीस निरीक्षक सुरज गवस यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा मोठा अपघात झाला. गाडीचं स्टिअरिंग फिरल्याने गाडी रस्त्याच्या कडेला गेली आणि खाडीत कोसळली. सकाळी सात वाजता अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत त्या दोघांचे मृतदेह गाडीमधून बाहेर काढले

ADVERTISEMENT

.ईश्वरीने नुकतंच एका हिंदी आणि मराठी चित्रपटाचं चित्रीकरण केलं होतं. सोबतच तिने हिंदी आणि मराठी मालिकांचं चित्रीकरण देखील पूर्ण केलं होतं. अलीकडे ईश्वरी काही मराठी मालिकांमध्येही झळकली होती. यापूर्वी अनेक हिंदी मालिकांमध्येही ईश्वरीने काम केलं आहे.

ईश्वरी आणि शुभम गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते. या ओळखीचं प्रेमात रूपांतर झाल्याने ते गेले काही महिने एकमेकांना डेट करत होते. पुढच्या आठवड्यात ईश्वरी आणि शुभम साखरपुडा करणार होते. मात्र त्यांचा संसार सुरू होण्यापूर्वीच संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT