Baipan Bhari Deva : हिरो नसलेला मराठी सिनेमा बॉलिवूडला भिडला; कमावले…
मराठी चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अनेक नरेटिव्ह बदलले आहेत. छोट्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या केवळ 11 दिवसांत 30 कोटींहून अधिक कमाई झाली आहे.
ADVERTISEMENT

Baipan Bhari Deva Box Office Collection : मराठी चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अनेक नरेटिव्ह बदलले आहेत. छोट्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या केवळ 11 दिवसांत 30 कोटींहून अधिक कमाई झाली आहे. एका अतिशय सामान्य कथेला दिग्दर्शनाच्या कलात्मकतेसह कलाकारांनी खास बनवलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चित्रपटात एकही हिरो नाही. (Baipan Bhari Deva Box Office Collection Fire Breaking Records of Bollywood Films)
मराठी चित्रपट इतिहासातील मोठा विक्रम!
रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी मोने, सुचित्रा बांदेकर, दीपा परब आणि शिल्पा नवलकर यांसारख्या नामांकित अभिनेत्री ‘बाईपण भारी देवा’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. केवळ 5 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 30 जून रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकला. अवघ्या 11 दिवसांत हा चित्रपट कमाईच्या बाबतीत अनेक बिग बजेट चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे.
वाचा : एकनाथ शिंदेंचे खास, पण अजितदादांच्या एंट्रीनं होणार गेम, गादी जाणार?
बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकली तर या चित्रपटाने 11 दिवसांत 30 कोटींहून अधिक कमाई केली आहे. म्हणजेच चित्रपटाने बजेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास 90 लाखांची कमाई केली होती. यानंतरही चित्रपटाची जबरदस्त कमाई सुरूच आहे. ‘बाईपण भारी देवा’ने दुसऱ्या आठवड्यात 13.50 कोटींची कमाई केली. त्याचबरोबर तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाकडून चांगली कमाई अपेक्षित आहे.
दररोज बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे नेट इंडिया कलेक्शन काहीसे असे आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी शुक्रवारी 90 लाखांची कमाई केली. त्यानंतर शनिवारी 2.13 कोटी रुपये आणि रविवारचे कलेक्शन 2.97 कोटी होते. तर दुसरीकडे, चित्रपटाने सोमवारी 91 लाखांची कमाई केली. मंगळवारी 1.37 कोटी रूपये, बुधवारी 1.72 कोटी रूपये आणि गुरुवारी 1.50 कोटी रूपये जमा झाले.