बॉलिवूडपेक्षा साऊथमध्ये कंगनाचा सर्वाधिक दबदबा; ‘चंद्रमुखी 2’ करिअरसाठी ठरणार गेम चेंजर?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Kangana Ranaut : कंगना राणौत (Kangana Ranaut) नेहमीच तिच्या अभिनयासह बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. ती जितकं स्पष्टवक्तव्य करते तितकंच ती तिच्या कामातूनही दाखवून देते. अनेक वेळा बॉक्स ऑफिसवर तिचे चित्रपट चांगली कामगिरी करू शकले नाहीत पण तरीही ती तिच्या टॅलेंटच्या जोरावर पुढे जात असते. (Chandramukhi 2 will be a game changer for Kangana Ranaut’s career in south than Bollywood)

कंगना सहसा तिच्या प्रत्येक चित्रपटात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. जसं की धाकड, जजमेंटल है क्या, सिमरन, पंगा, मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाशी. या सर्व चित्रपटांमध्ये कंगनाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. धाकडमधली एजंट अग्नी, पंगा मधली कबड्डी चॅम्पियन, मणिकर्णिका मधली राणी लक्ष्मीबाई, जजमेंटल है क्या मधली सायको मुलगी. कंगनाने प्रत्येक चित्रपटात उत्कृष्ट आणि दमदार अभिनय केला. पण हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.

Nishikant Dubey : ’70 हजार कोटी घोटाळ्यात केस पृथ्वीराज चव्हाणांनी केली’

लवकरच कंगना रणौत एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ती ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटासाठी काम करतेय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कंगना बनणार चंद्रमुखी!

चंद्रमुखी या हॉरर-कॉमेडी चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कंगना सर्वांना घाबरवताना दिसणार आहे. चंद्रमुखीमधला कंगनाचा लुक खूपच रॉयल आणि पारंपरिक आहे. याचा पोस्टरही प्रदर्शित झाला आहे. हिरव्या रंगाची साडी, कुरळे केस, कुंदन जडित असलेले दागिने यामध्ये कंगना खूपच सुंदर दिसत आहे.

यंदाच्या गणेश चतुर्थीला हा चित्रपट तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्या विरुद्ध राघव लॉरेन्स दिसणार आहे. हा चित्रपट 10 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होईल. तसंच हा चित्रपट कंगनाच्या करिअरसाठी गेम चेंजर मानला जात आहे. याचे कारण म्हणजे तिचे मागील 9 बॉलिवूड फ्लॉप चित्रपट आहेत. तसंच तिचा बॉलिवूडपेक्षा सर्वाधिक दबदबा दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आहे. आतापर्यंत तिने साऊथचे फक्त तीनच चित्रपट केले असले तरी सर्वच बिग बजेट सुपरहिट ठरले आहेत.

ADVERTISEMENT

कल्याण : 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण, आरोपी म्हणाला, ‘देवाने चार मुली दिल्या, पण…’

कंगनाचे साउथमधील ‘ते’ 3 सुपपहिट चित्रपट कोणते?

तामिळमधील कंगनाचा पहिला साऊथ ओरिएंटेड चित्रपट ‘धाम धूम’ हा होता. 2008 मध्ये आलेल्या या चित्रपटात तिच्या विरुद्ध जयम रवी होते. 2006 मध्ये आलेल्या गँगस्टर चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2 वर्षांनी तिला हा बिग बजेट चित्रपट मिळाला. मर्डर मिस्ट्रीची ही कथा लोकांना आवडली. 10 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच निम्मा खर्च वसूल केला होता. धाम धूम बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

ADVERTISEMENT

त्यानंतर पुरी जगन्नाथ दिग्दर्शित एक निरंजन या तेलगू चित्रपटात कंगनासोबत सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत होता. 2009 मध्ये आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. या चित्रपटाद्वारे तिने तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केले. कंगनाला या चित्रपटासाठी एक कोटींचे मानधन देण्यात आले होते. कंगनाची कारकीर्द सुरू होऊन अवघी तीन वर्षे झाली होती, त्यामुळे एवढी मोठी रक्कम मिळणं ही रेकॉर्ड ब्रेकिंग गोष्ट होती.

No-Confidence Motion: ‘…तर मी तुमची औकात काढेल’, राणेंनी लोकसभेत का वापरले असे शब्द?

2021 साली प्रदर्शित झालेला थलायवी हा चित्रपट कोरोना काळात इतका हिट ठरला की कंगनाच्या करिअरला ब्रेक मिळाला. दिवंगत भारतीय अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात कंगनाने उत्कृष्ट अभिनय केला. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.

‘चंद्रमुखी 2’सह कंगनाच्या आणखी दोन चित्रपटांची चर्चा…

मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाशी हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेला कंगनाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काळ चालला नाही. देशातू कोरोनाचा काळ गेला, पण त्याची सावली अजूनही कंगनाच्या कारकिर्दीवर असल्याचं म्हटलं जातं. या दृष्टिकोनातून कंगनाच्या करिअरला साऊथच्या चित्रपटांतून खूप चालना मिळाली आहे. कंगनाच्या करिअरचा आलेख उंचावण्यास या चित्रपटांची खूप मदत झाली. अशा परिस्थितीत चंद्रमुखी 2 तिच्या करिअरसाठी गेम चेंजर ठरणार असल्याचं म्हटलं जातंय.

तसंच आगामी काळात कंगनाचे एमर्जन्सी आणि तेजस असे आणखी दोन चित्रपट येणार आहेत. एमर्जन्सीमध्ये ती इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे तर तेजसमध्ये ती एक एअरफोर्स जवान म्हणून दिणार आहे. या चित्रपटांचीही सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT