Urmila Kothare: अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या भरधाव कारने दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू

मुंबई तक

Urmila Kothare Car Accident: अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा मुंबईत अपघात झाला असून त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

ADVERTISEMENT

अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या भरधाव कारने दोघांना चिरडलं
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या भरधाव कारने दोघांना चिरडलं
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात

point

अपघातात एका व्यक्तिचा मृत्यू

point

अपघातात अभिनेत्री उर्मिला कोठारेही जखमी

Urmila Kothare Car: मुंबई: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या मेट्रोच्या दोन मजुरांना चिरडलं. ज्यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी असल्याचं समजतं आहे. तर या अपघातात अभिनेत्री उर्मिाल कोठारे ही देखील जखमी झाली आहे. काल (27 डिसेंबर) रात्री मुंबईतील कांदिवली परिसरातीस पोईसर मेट्रो स्थानकाजवळ तिच्या कारला अपघात झाला. (popular marathi actress urmila kothare speeding car crushed two people one died in mumbai) 

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने आणि कारचा वेग जास्त असल्याने हा भीषण अपघात झाल्याचं नुकतंच समोर आलं आहे. ज्या दोघांना उर्मिलाच्या कारने चिरडलं ते दोघेही मेट्रोचे कामगार होते.

अपघातग्रस्त कार

हे ही वाचा>> Nanded : हॉर्न वाजवल्याचा राग, तरूणानं थेट फॉर्च्युनवर चढून हल्ला केला, गाडी चालवणाऱ्या डॉक्टरने थेट...

मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिला शूटिंग आटोपून घरी परतत असताना हा अपघात झाला. कारचा वेग जास्त असल्याने चालकाला त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. तर आणखी एक कर्मचारी जखमी झाला आहे.

पोलिसांनी दाखल केला गुन्हा

मुंबईतील कांदिवली येथील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली ज्यानंतर पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. कारची धडक बसलेले मेट्रोचे दोन कर्मचारी रस्त्याच्या कडेला काम करत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp