Vikram Gokhale:’एखादा मानसोपचार तज्ञ आहे का पहाण्यात’, या मराठी अभिनेत्याचा विक्रम गोखलेंना टोला

मुंबई तक

अभिनेत्री कंगना रनौत पाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विक्रम गोखले यांनी कंगना रनौतने केलेलं विधान बरोबर असल्याचं सांगत समर्थन केलं. त्यानंतर विक्रम गोखले यांच्यावर टीका होत असून, अभिनेता किरण मानेंनी विक्रम गोखलेंना सोशल मिडीयावरून टोला लगावला आहे. आपल्या फेसबुक वॉलवर विक्रम गोखलेंचा एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीचा व्हिडिओ किरण माने यांनी पोस्ट केला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अभिनेत्री कंगना रनौत पाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विक्रम गोखले यांनी कंगना रनौतने केलेलं विधान बरोबर असल्याचं सांगत समर्थन केलं. त्यानंतर विक्रम गोखले यांच्यावर टीका होत असून, अभिनेता किरण मानेंनी विक्रम गोखलेंना सोशल मिडीयावरून टोला लगावला आहे. आपल्या फेसबुक वॉलवर विक्रम गोखलेंचा एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीचा व्हिडिओ किरण माने यांनी पोस्ट केला आहे.

अभिनेत्री कंगना रनौतने भारतीय स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी जे मिळालं, ते स्वातंत्र्य नव्हतं, तर भीक होती. खरं स्वातंत्र्य 2014 रोजी मिळालं’, असं विधान कंगनाने केलं होतं. याविधानावरून कंगनावर प्रचंड टीका होत आहे. दरम्यान, कंगनाने केलेल्या विधानाचं अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केलं. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर किरण मानेंनी टीका केली आहे. ०१४ नंतर देशात केलेल्या घाणींचा पाढा वाचून आदरणीय पंतप्रधानांचा निषेध करताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले !

(बाय द वे, थोडं विषयांतर करतो..एखादा बरा मानसोपचार तज्ञ आहे का पहाण्यात…??) अश्या प्रकारचा टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp