Manipur Video, Devoleena Bhattacharjee : यासारखं नीच कृत्य…’, अभिनेत्री भडकली

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Devoleena Bhattacharjee gets angry after watching manipur video, actress said this heinous crime
Devoleena Bhattacharjee gets angry after watching manipur video, actress said this heinous crime
social share
google news

Manipur Violence : मणिपूरमधील कुकी समाजातील महिलांवर झालेल्या क्रूर हिंसाचाराने संपूर्ण देश हादरला आहे. अगदी घृणास्पद अशी लाजिरवाणी ही घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकरणावर टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने आपले मत मांडत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (TV actress Devolina Bhattacharjee’s anger after seeing that video of cruelty in Manipur )

मणिपूर हिंसाचाराचा (Manipur Violence) तो व्हायरल व्हिडीओ पाहून देवोलीना म्हणाली की, ‘मी आसामची आहे. आम्ही ईशान्य पूर्वेचा महत्त्वाचा भाग आहोत. ईशान्येतील असे मुद्दे आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत हे नाकारता येणार नाही. आमच्या राज्यांकडे नेहमीच दुर्लक्ष झालं आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत हे भाग सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आले आहोत. मी नुकताच जो व्हिडिओ पाहिला त्यानंतर मला या कृत्याने धक्काच बसला. मी पूर्ण शांत होती. मी कोणत्या स्तरावर निषेध करावा हे समजत नव्हतं. मी कितीही राग व्यक्त केला तरी तो कमीच.’

मणिपूर : महिलांवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीचं घर संतप्त जमावाने पेटवलं

‘खालच्या स्तराचे लोक, त्याचं समर्थन करतील’- देवोलीना

देवोलीना पुढे म्हणाली, ‘मला चांगलं माहीत आहे की काही खालच्या स्तराचे लोक असतील, जे या कृत्याचं समर्थन करतील आणि कारणं देतील. मी हे ही समजते की तुमचा कोणताही युक्तिवाद असू शकतो, परंतु कोणीही इतक्या क्रूर लज्जास्पद पातळीवर जाऊ शकत नाही. मी त्या ठिकाणची असल्याने मैतेई आणि कुकी समाजात समस्या आहेत हे मला चांगलंच माहीत आहे. मात्र हे कृत्य मानवतेला लाजवेल असं आहे. जेव्हा हे कृत्य घडलं, त्यावेळी कारवाई का झाली नाही?’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आज आपण अशा काळात जगतोय जिथे एका सेलिब्रिटीला त्यांचा विमानतळावरील लुक दाखवायला पाच मिनिटं लागत नाहीत हे तर खूप दुःखद आहे. पण, ही समस्या लोकांच्या लक्षात यायला दोन महिने लागले. हे वाईट आहे. मला त्या लोकांची लाज वाटते जे हे कृत्य लपवण्याची भाषा करतात.’

Manipur : भाजप आमदार अतुल भातखळकरांनी सुप्रीम कोर्टालाच सुनावलं, प्रकरण काय?

दोन महिने व्हिडीओ का लपवला गेला?

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेत संतप्त देवोलीना म्हणाली, ‘तीन महिने तिकडे लोक तणावात आहेत, पण कोणीही येऊन यावर बोललं नाही. आपल्या पंतप्रधानांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ 4 मे रोजी शूट करण्यात आला आहे, मी विश्वास ठेवू शकत नाही की कोणत्याही प्रशासकाला या व्हिडीओबद्दल माहिती नसेल. त्याचबरोबर येथील आजूबाजूचे लोकही जागरूक असतील. इतक्या सरकारी पक्षांचे लोक आले आणि त्यांनी या प्रकरणाकडे लक्षही दिलं नाही, याचे आश्चर्य वाटते.’

ADVERTISEMENT

‘या व्हिडीओची कल्पना नसेल तर, तुमच्या राज्यात काय चाललं आहे? आणि तेथील मुलींचे भवितव्य काय आहे हे तुम्हाला माहीत नाही ही शरमेची बाब आहे. ज्या दिवशी या गोष्टी घडल्या त्या दिवशी आपल्या राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारून कारवाई करायला हवी होती. आता तिथे इंटरनेटवर बंदी आहे, असं का? कारण तुम्हाला या गोष्टी लपवायच्या होत्या? ज्या गोष्टींवर बंदी घातली पाहिजे, ती करणार नाहीत, पण ज्या गोष्टींमुळे लोकांमध्ये जागृती निर्माण होईल, अशा गोष्टींवर बंदी घातली. ही घटना लपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याची माझी भावना आहे.’

ADVERTISEMENT

महिलांना नेहमीच टार्गेट का केलं जातं?

देवोलिना या मुद्दयावर म्हणाली, ‘लोक स्वत:चाच अजेंडा काढत आहेत. याला राजकीय आणि जातीय रंग देण्याची त्यांची स्पर्धा आहे. अरे, त्या मुली आहेत. कित्येक पुरूष त्या मुलींवर गिधडासारखे तुटून पडतात आणि त्यांच्यावर अशी अमानवी कृत्ये करतात. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची भीती नाही का? मला खूप लाज वाटते की माझा अशा राज्याशी आणि देशाशी संबंध आहे. यावर अद्याप कारवाई का झाली नाही. एका यंत्रणा, प्रशासनाच्या नावाखाली आपण अपयशी ठरलो आहोत. तुम्ही निषेध करूनही तुमचा राग व्यक्त करू शकत होता. तुम्हाला धिंड काढण्यासाठी एक मुलगीच मिळाली का? शी…’

Mumbai Rain: मुंबईत तुफान पाऊस, हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन बंद

कोणाला तोंडही दाखवू शकत नाही…

‘एक महिला म्हणून मला लाज वाटते. आपल्या देशात आणि राज्यात अशी घटना घडली आहे, यामुळे मी कोणाला तोंड दाखवू शकत नाही, असं मला वाटतं. इथे जर कोणाच्या गळ्यातून चेन हिसकावून घेतली तर त्याचे अपडेट इंटरनेटवर दोन सेकंदात येतात आणि त्या निष्पाप मुलींसोबत जे घडलं ते दोन महिन्यांनी कळतंय. लोक मणिपूरबद्दल बोला यासाठी रोज ओरडत आहेत. कारवाई करा सांगतायत. जेव्हा आपण स्वतः काही करू शकत नाही यासाठीच कदाचित सरकार आणि नेत्यांची निवड करतो आणि म्हणूनच आम्ही मतदान करतो.’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT