कपिल शर्मा पुन्हा का भडकला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोमवारी कॉमेडियन कपिल शर्मा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला. यावेळी कपिल व्हिलचेअरवर बसून बाहेर निघाल्याने फॅन्सच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या. एअरपोर्टवर असलेल्या फोटोग्राफर्सने कपिलची चौकशी केली असता मात्र कपिल त्यांच्यावर भडकला आणि उद्धटपणे बोलताना आढळून आला. तर कपिलचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कपिल व्हिलचेअरवर बसून जातोय आणि याचवेळी तिथे उपस्थित काही फोटोग्राफर्स फोटो क्लिक करताना कपिलची विचारपूस करतायत. कपिल सर तुम्ही कसे आहात, आम्ही व्हिडीओ शूट करतोय, असं फोटोग्राफर्सने म्हटल्यानंतर कपिलने त्यांना उद्धटपणे उत्तर दिलंय.

हे वाचलं का?

कपिल म्हणाला, तुम्ही आधी सर्वजण बाजूला व्हा इथून…’ दरम्यान यावर फोटोग्राफर्स कपिलला थँक्यू म्हणून बाजूला होतात. मात्र थोडं पुढे गेल्यावर कपिल त्यांना ‘उल्लू के पठ्ठे’ असं भडकून म्हणतो. दरम्यान कपिलचं हे वागणं कॅमेरामध्ये कैदही झालंय. ‘हे सर्व रेकॉर्ड झालं आहे’, असं जेव्हा फोटोग्राफरने कपिलला सांगितलं त्यानंतर, ‘करा रेकॉर्ड, सर्वजण बेशिस्त आहात.’ असंही कपिलने रागात म्हटलंय.

ADVERTISEMENT

दरम्यान यापूर्वी देखील कपिलचा को-अॅक्टर सुनील ग्रोवरसोबतचं त्याचं भांडण चर्चेत राहिलं होतं. या भांडणानंतर सुनीलने कपिलवर शिवीगाळ करण्याचा त्याचप्रमाणे इतर कलाकारांना कमी लेखलं असल्याचा आरोप केला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT