‘हा’ मेसेज म्हणजे धोकाच! राम मंदिराच्या नावाखाली तुमचीही होऊ शकते फसवणूक

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Ayodhya Ram Mandir Related viral Scam Messages on Whatsapp Be Aware about it
Ayodhya Ram Mandir Related viral Scam Messages on Whatsapp Be Aware about it
social share
google news

Ayodhya Ram Mandir Scam Messages : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरात (Ram Mandir) प्रभू रामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी आता फक्त काहीच दिवस उरले आहेत. अशावेळी यासंबंधित खोट्या बातम्याही झपाट्याने पसरत आहेत. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात मोफत व्हीआयपी एन्ट्रीचे (Ram Mandir Free VIP Entry) आश्वासन देणारे मेसेज सायबर (Cyber Scam) गुन्हेगारांकडून सध्या व्हॉट्सअॅपवर येत आहेत. (Ayodhya Ram Mandir Related viral Scam Messages on Whatsapp Be Aware about it)

सोशल मीडियावरील ‘या’ मेसेजेसना चुकूनही पडू नका बळी…

या मेसेजेसमध्ये ‘राम जन्मभूमी गृहसंपर्क अभियान.apk’ या नावाची नावाची APK (Android Application Package) फाइल आहे. यानंतर, दुसरा मेसेजमध्ये VIP एन्ट्रीसाठी एक अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितलं जात आहे. मंदिर उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या भाविकांची फसवणूक करण्याचं हे एक प्रकारचं जाळं आहे.

वाचा : Lok Sabha 2024 : भाजपची झोप उडवणारी भविष्यवाणी; थरूरांनी सांगितलं किती जिंकतील जागा?

तसंच, राम मंदिरसाठी देणगी गोळा करण्याच्या नावाखालीही मोठी फसवणूक सुरू आहे. देणगी जमा करण्यासाठी लोकांना क्यूआर कोड पाठवले जात आहेत. क्यूआर कोडद्वारे त्यांना विश्वास दिला जात आहे की, ही देणगी श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला जाईल, पण हे साफ खोटे आहे. हा सगळा पैसा सायबर गुन्हेगारांच्या खात्यात जात आहे. जर कोणाला राम मंदिरासाठी देणगी द्यायचीच असेल तर तो श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या अधिकृत खात्यात सहज देणगी जमा करू शकतो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, डिसेंबरपर्यंत मंदिराच्या समर्पण निधी खात्यात 3,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या प्राप्त झाल्या आहेत. ट्रस्टकडे उपलब्ध माहितीमध्ये असे सांगण्यात आले की, राम मंदिरसाठी सर्वात जास्त देणगी आध्यात्मिक गुरू आणि कथाकार मोरारजी बापू यांनी दिली आहे. त्यांनी राम मंदिरसाठी 11 कोटी 30 लाख रुपयांची देणगी दिली आहे.

वाचा : Kolhapur News : रिक्षातून आले अन् तलवारी उपसल्या; सपासप 18 वार करत…

यासोबतच मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिरच्या प्रसादाबाबतही फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. खादी ऑरगॅनिक नावाची वेबसाइट दावा करत आहे की, ते पहिल्या दिवशीचा पूजा प्रसाद भाविकांच्या घरी पोहोचवेल. प्रसादासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, मात्र 51 रुपये डिलिव्हरी चार्ज भरावा लागेल. पण, वेबसाईटच्या अबाउट अस सेक्शनमध्ये गेल्यास, राम मंदिरच्या प्रसादाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट होते. खादी ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) वेबसाइटवर गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

वाचा : Lok Sabha 2024 : “पृथ्वीराज चव्हाण धडधडीत खोटं बोलताहेत “, ‘वंचित’ भडकली

ऑनलाइन घोटाळ्यांपासून कसं रहाल सावध?

  • ऑनलाइन सुरक्षिततेसाठी, संशयास्पद वाटणाऱ्या अज्ञात फायली किंवा अॅप्स डाउनलोड करू नये.
  • जेव्हा राम मंदिराच्या उद्घाटनाशी संबंधित कोणतीही माहिती येते तेव्हा विश्वासार्ह स्त्रोताकडून पुष्टी करा किंवा अधिकृत वेबसाइटवर तपासा.
  • बेजबाबदार न राहता सतर्क राहिल्यास अशा सायबर घोटाळ्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यात मदत होईल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT