Kala Pani Jail : अंगावर येतो काटा… सावरकरांना ठेवलेल्या काळा पाणी तुरुंगाचा इतिहास काय?
भारतीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 24 डिसेंबर 1910 रोजी अंदमान येथील काळा पाणी तुरूंगात, काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली होती. आज आपण सेल्युलर जेल उर्फ सजा-ए-काला पानी याबद्दल आपण जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

History of Andaman Cellular Jail : भारतीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 24 डिसेंबर 1910 रोजी अंदमान येथील काळा पाणी तुरूंगात, काळ्या पाण्याची शिक्षा ठोठवण्यात आली होती. द स्टोरी ऑफ माय ट्रान्सपोर्टोशन फॉर लाइफ या त्यांच्या पुस्तकात सावरकरांनी लिहिलं की, जेव्हा ते पहिल्यांदा सेल्युलर जेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी जेलर डेव्हिड बॅरीच्या तोंडून हे शब्द ऐकले की, ‘तुम्हाला ही भिंती दिसत आहे. ती एवढी खाली का आहे माहीत आहे का? कारण त्यांच्या पलीकडे हजार मैलांपर्यंत फक्त समुद्र आहे. त्यामुळे या ठिकाणाहून पळून जाणे अशक्य आहे.’ (Cellular Jail Kala Pani history where Veer Savarkar was sentenced to black water)
डेव्हिड बॅरी ज्या जेलबद्दल बोलत होता. ते आपण काळा पाणी या नावाने ओळखतो. अंदमानच्या सेल्युलर जेलला काला पाणी का म्हटले जाते? भारतीय इतिहासातील सर्वात प्रसिद्ध तुरुंगाची कहाणी काय आहे आणि त्याचे नाव ऐकताच लोक का थरथर कापायचे. आज आपण सेल्युलर जेल उर्फ सजा-ए-काला पानी याबद्दल आपण जाणून घेऊयात.
Ganesh Visarjan 2023 Mumbai : ‘…आता डोळे भरुन आलेत बाप्पा तुला पाहुन जाताना’
काळा पाणी हे नाव कसं पडलं?
काळा पाणीची कहाणी 1857 पासून सुरू झाली. क्रांतीच्या काळात आणि क्रांतीनंतरही इंग्रज पकडलेल्यांना फासावर लटकवायचे किंवा तोफेच्या तोंडाला बांधून उडवायचे. तसंच, सर्वांसोबत असं घडलं नाही. अनेकांना कैद करण्यात आलं आणि बंडाच्या भीतीने इंग्रजांनी त्यांना मुख्य भूमीपासून दूर पाठवण्याचा निर्णय घेतला. यावेळी अंदमान बेटाची निवड करण्यात आली. अंदमान बेटांवर पाठवताना समुद्रातून प्रवास करावा लागला.